आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कुमार विश्वकोश’साठी डॉ. नूलकर यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘कुमारविश्वकोश भाग १४’ मधील काही नोंदींविषयी लेखन करण्याचे काम येथील प्रा. डॉ. सत्यव्रत नूलकर यांच्याकडे सोपवण्यात आले. ते पुरातत्त्व विषयातील संशोधक आहेत. मराठी विश्वकोश कार्यालयाने त्यांची निवड केली. व्यक्ती, मंदिरे, शहर संस्कृती या संदर्भातील नोंदी ते करणार आहेत. त्यांचा काळ प्राचीन आहे. संबंधित नोंदी या लॅटिन अमेरिका, ग्रीस, तुर्कस्तान, इटली, इराण, इराक या देशांशी संबंधित आहेत. या नोंदीचा विषय भारताबाहेरील प्राची संस्कृती असा आहे.