आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंग डाॅ. ज्ञानराजने तोंडाचे ‘हात’ बनवत तयार केले संकेतस्थळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाविद्यालयात शिकत असताना तीन वर्षांपूर्वी एका जीवघेण्या अपघाताला सामोरे जाताना शरीराला पंगुत्व आलेे; पण आतील जिद्दीने हार मानली नाही. अवघ्या तीन वर्षात डॉ. ज्ञानराज होमकरच्या मनाने उभारी घेतली. कुटुंब आणि मित्रांच्या साथीने सध्या तोंड या नियंत्रणात असलेल्या अवयवाचे हात बनवत ज्ञानराजने ११ वी १२ च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचे संकेतस्थळ निर्माण केले आहे.

२०१३ मध्ये बारावीनंतर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात बीएएमएस अभ्यासक्रमात शिकणाऱ्या ज्ञानराज हा निरोपाच्या स्नेहसंमेलनात दोरी नृत्य (रोप डान्स) सादर करत होता. अचानक काय झाले? माहीत नाही. तो स्टेजवरच कोसळून पूर्ण बेशुद्ध पडला आयुष्यभराचे शरीरास पंगुत्व आले. यापूर्वी त्याने अभ्यासक्रमातील चार वर्षे उत्साहात काढत अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. पण अचानक घडलेल्या या प्रसंगाने गांगरून जाता त्याने एक जिद्द केली आणि आज त्याला मूर्तरूप आले आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम, प्रश्नोत्तरी, परीक्षा कशी द्यावी, अभ्यास कसा करावा यावर काम करीत असून अल्पावधीत ते संकेतस्थळ पूर्ण होईल.

संकेतस्थळ विकसित
^संगणक मोबाइल हाताळण्यासाठी तोंडी धरता येणारी सेन्सर स्टीक तयार केली असून याद्वारे संगणकावर अकरावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीचे संकेतस्थळ (www.drdrh.in) हे विकसित केले आहे. आता स्पर्धा परीक्षा मेडिकल, आयुर्वेद यावर काम सुरू आहे. याचा सर्वांना फायदा होईल.'' डॉ.ज्ञानराज होमकर, संकेतस्थळ निर्माता
अपंग डाॅ. ज्ञानराजने तोंडाचे ‘हात’ बनवत तयार केले संकेतस्थळ

यूट्यूबवर व्हिडिओ
नुकताच त्याने तरुणाईला प्रेरणा देणारे काही व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित केले आहेत. जे पाहून एेकून एक नवचैतन्य जागृत करण्याचे काम होत आहे. तसेच हे व्हिडिओ मालिका स्वरूपात प्रसारित होत आहेत. तसेच मध्यंतरी त्याने कल्याण ठाणे येथे जात मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून व्याख्यानेही दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...