आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Girish Chandak On Plane Gets Help After Tweets To Sushma Swaraj

बंगळुरूत ट्विट, सोलापूरच्या विमान प्रवाशावर अलास्कात उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कॅलिफोर्नियात मुलीकडे हवाईमार्गाने िनघालेल्या सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. िगरीश चंडक यांना प्रवासात असतानाच पक्षाघाताचा सौम्य झटका अाला. वैद्यकीय मदतीसाठी त्यांना अलास्का येथे िवमानातून उतरवण्यात अाले. तेवढ्यात बंगळुरू येथील नातवाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व यूएस अॅम्बसी यांना रात्री िट्वट करून घटना कळवली. अवघ्या तासात त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

डाॅ. गिरीश चंडक (वय ७७) व त्यांच्या पत्नी तारा (७४) हे कॅलिफोर्नियास्थित मुलगी वृषाली तापडिया हिच्याकडे कॅथे पॅसिफिक या कंपनीच्या विमानाने १६ एप्रिल रोजी िनघाले होते. पॅसिफिक ओशन येथे १५ एप्रिलची ती रात्र होती. पॅसिफिक ओशन येथून विमान जात असताना चंडक यांना पॅरालिसिसचा सौम्य झटका आला. सहप्रवासी डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार अलास्का येथे त्यांना उतरवले. अँकरेज शहरातील प्रॉव्हिडन्स हेल्थ सेंटर या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. चंडक दांपत्यांबरोबर या वेळी कोणीही नव्हते. बंगळुरू येथे राहत असलेला त्यांचा मोठा मुलगा मनीष यास घटनेची माहिती मिळाली. परदेशातील मित्र-नातेवाईक यांच्याकडून काही मदत मिळेल काय? याच्या प्रयत्नासाठी मनीष फोन करत होते. दरम्यान, मनीष यांचा मुलगा हर्ष याने सुषमा स्वराज तसे यूएस अॅम्बसी यांना ट्विटद्वारे माहिती देऊन मदतीची मागणी केली.
उद्याेगपती तलवार मदतीला धावले
अलास्काचे उद्योगपती संजय तलवार यांना याबाबत माहिती िमळाली. ते पत्नीसह रुग्णालयात गेले. हर्ष याने टि‌्वट केल्याने अापण अाल्याचे त्यांनी सांगितले, तेव्हा चंडक यांना खूप माेठा अाधार मिळाला.
हर्षची समयसूचकता
- मुलगा हर्ष याने नुकतीच बारावीची परीक्षा िदलेली अाहे. तीन-चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या वाचनात अशा स्वरूपाचे वृत्त अाले होते. प्रवासात असलेल्या एका रुग्णाने जनरल व्ही. के. सिंग यांना ट्विट केल्यानंतर वैद्यकीय मदत मिळाली होती. हर्षने ट्विट केल्यानेच माझे वडील गिरीश चंडक यांना यूएस अॅम्बसी यांच्याकडून मदत िमळाली. सुषमा स्वराज यांच्यामुळे यंत्रणा सतर्क झाली. मला या सेवेचा अभिमान वाटतो.
- मनीष चंडक, रुग्णाचे िचरंजीव, बंगळुरू
पुढील स्‍लाइडवर पााहा, सुषमा स्‍वराज यांना केलेले ट्वीट...