आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय एकांकिका स्पर्धेत ‘साडेसहा रुपयांचे काय केलेस ?’ प्रथम, ‘साठी काठी’ला द्वितीय क्रमांक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या लक्ष्मणराव देशपांडे स्मृती विभागीय एकांकिका स्पर्धेत सोलापूरच्या महानगर नाट्य परिषद शाखेच्या ‘साडे सहा रुपयांचे काय केलेस” या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. तर बीड नाट्य परिषदेच्या ‘साठी काठी’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही एकांकिकेची अंतिम फेरीत मुंबईसाठी निवड झाली आहे. 
 
दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अश्विनी तडवळकर (साडे सहा ...) यांना तर द्वितीय प्रा. संजय पाटील (साठी काठी) यांनी पटकावले. तर पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक श्रीनिवास देशपांडे ( प्रदीप, साडे सहा...) यांना तर द्वितीय पारितोषिक अक्षय फुलझळवे ( साठी काठी, म्हातारा) यांनी प्राप्त केले. तर स्त्री अभिनय प्रथम पारितोषिक अपर्णा गव्हाणे (नूर दर्दपोरा) द्वितीय पारितोषिक अश्विनी तडवळकर (माधवी, साडे सहा...) यांनी पटकाविले. स्त्री उत्तेजनार्थचे पारितोषिक ममता बोल्ली (दर्दपोरा), ज्ञानेश्वरी देशपांडे (मुलगी, साठी काठी), चित्रगंधा निकंबे (श्रेया कांबळे, लाल काळोख). अभिनयाचे उत्तेजनार्थ पुरुष प्रमोद शेटे (व्यक्ती, चंद्रपूरच्या जंगलात, पंढरपूर शाखा), सूरज लोंढे (आदित्य, लालकाळोख, मुख्य शाखा सोलापूर), महेश डांबरे (अतिरेकी मिशन ३७०, उस्मानाबाद शाखा). परीक्षक म्हणून मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक शशिकांत लावणीस यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरणाप्रसंगी अध्यक्ष विजय साळुंके, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, राजा बागवान, दिलीप कोरके, जयप्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...