आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोअर मारून पाणी घेण्याचा 'देखावा', विसर्जनकुंड भरले पिण्याच्या पाण्याने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  महापालिकेने वेळेवर बोअर मारून त्याद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे जवळपास तीन एमएलडी पिण्याचे पाणी गणपती विसर्जन कुंडात सोडावे लागले अाहे. शनिवारी बोअर मारून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून केवळ एक दशलक्ष लिटर इतकेच पाणी बोअरद्वारे उपलब्ध झाले. तेच बोअर जर सुरुवातीलाच घेतले असते तर त्याद्वारे कुंड भरता अाले असते. दरम्यान, गणपती विसर्जनासाठी मंगळवार हा कोणताही अडसर नाही. दिवसभरात कधीही विसर्जन करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. तर पोलिसांनी रविवारी विसर्जन मार्गावर रूटमार्च केला. सीसीटीव्ही कॅमेरेही उभारले अाहेत. 
 
एेन श्रावणात सिद्धेश्वर तलाव रिकामा झाल्यामुळे तेथील गणपती विसर्जन करण्यासाठी उभारण्यात अालेेले कुंडही रिकामे झाले. त्यात घाण पाणी अाहे, ते बदलून स्वच्छ पाणी द्यावे, असा मुद्दा पुढे अाणला गेला अाणि महापालिकेतील बैठकीत पिण्याचे पाणी सोडण्याचा अजब निर्णय घेण्यात अाला. त्याची सर्व तयारी महापालिकेने केली. पण पिण्याचे पाणी सोडण्यावरून लोकांमधून नाराजीचा सूर अाल्यानंतर बोअरद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न शनिवारी पालिकेने केला. बोअर मारलेही. पण त्यातून दिवसभरात एक दशलक्ष लिटर इतकेच पाणी घेता अाले. उर्वरित तीन दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी सोडलेले कुंडात सोडावे लागले. 
 
निर्माल्य जमा करण्याची सोय 
सिद्धेश्वर तलाव गणपती घाट, विष्णू घाट, पठाण बागेच्या पाठीमागील परिसर येथे इको पाँड, संभाजी तलाव येथे निर्माल्य संकलन पालिका प्रशासन आणि सेवाभावी संस्थांकडून सोय करण्यात आली अाहे. 
 
वाचले असते पिण्याचे पाणी 
महापालिकेने जेव्हा स्वच्छ पाणी सोडण्याची मागणी केली, तेव्हाच बोअर मारला असता तर अातापर्यंत तीनही कुंड भरले असते महापालिकेचे पिण्याचे पाणी वाचले असते. 
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सदर बझार पोलिस जेल रोड पोलिसांनी रूटमार्च केला. लष्कर, पूर्वभाग गणपती मध्यवर्ती मंडळ गणपती विसर्जन मिरवणुकीचा काही भाग या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. कमांडो पथक, महिला पुरुष पोलिस, राज्य राखीव दलाचे जवानांसह पाचशेहून अधिक पोलिसांचा ताफा होता. जेल रोडचे पोलिस निरीक्षक सय्यद सदर बझारचे निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी ही माहि ती दिली. जगदंबा चौकात सीसीटीव्हीचा शुभारंभ झाला. सोमवारी लोकमान्य मध्यवर्ती गणपती मिरवणूक मार्गावर रूटमार्च अाहे. 

उद्या दिवसभर करावे विसर्जन 
गणपतीचा वार मंगळवार असल्याने यादिवशी विसर्जन करू नये. तसेच बुधवारी गणेश प्रतिष्ठापनेला १३ दिवस होत असल्याने तेरावे होते, या अफवांना छेद देत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी एक खुलासा केला आहे. श्री गणेशाची प्रतिष्ठापना विसर्जन यात वारांचा अडसर नसतो. प्रथेप्रमाणे जशी प्रतिष्ठापना केली तशीच अनंत चतुर्दशीला विसर्जन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यंदा तर गणपतीचे वास्तव्य एक दिवस जास्त होते. पंचांगकर्ते दाते यांनी या धार्मिक विधी करताना वारांचा कोणताही अडसर नाही, असे सांगितले आहे. 
 
रात्री साडेअकरा वाजता सहा इंच पाईपने पिण्याचे पाणी सोडले जात होते, तेव्हा दोन्ही कुंडाच्या चार पायऱ्या इतकेच पाणी कमी होते. विष्णू कुंडात २० लाख लिटर तर गणपती घाट येथे ८० लाख लिटर पाणी (बोअरसह) उपलब्ध झाले अाहे. 
- सिद्धप्पा उस्तुरगे, उपअभियंता, पाणीपुरवठा, मनपा 
 
बातम्या आणखी आहेत...