आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिबक अनुदान गैरव्यवहारात 18 कंपन्या, 25 अधिकारी, 79 वितरकांवर ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- माळशिरस तालुक्यातील ठिबक सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात झालेल्या साडेदहा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील मोठमोठ्या १८ कंपन्या, २५ अधिकारी ७९ वितरकांवर चौकशी अहवालात ठपका ठेवला आहे. यामध्ये जैन, नेटाफीम, फिनोलेक्स, कोठारी अशा बड्या कंपन्यांचीही नावे आहेत. अधिकाऱ्यांची संख्या ४५ वर जाण्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे टाळले जात आहे. 


यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले असतानाही ते जाणीवपूर्वक टाळले जात आहे. वरिष्ठ पातळीवरही याची दखल घेतली जात नाही. यात अनेक बड्या कंपन्या कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्यांचे हात बरबटले आहेत. हा घोटाळा बाहेर काढून धसाला लावणारे माळीनगर येथील कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचा पाठपुरावा सुरूच आहे. पंढरपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी रवी कांबळे हे यासंदर्भात माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद देतो - देतो असे म्हणतात. पण मांजर कुठे आडवे येते हे त्यांनाच ठाऊक. आजमितीला फिर्याद दिलेली नाही. कांबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 


सू. ल. जाधव, बाणखेले, गावसाने आणि विजयकुमार इंगळे समिती अशा चौकशी समित्या नियुक्त करून चौकशी केली. प्रत्येक समितीनिहाय गैरव्यवहाराची रक्कम बदलत वाढत गेल्याने चौकशी त्यांचे कामही शंकेच्या गर्तेत आहे. शेवटी चौकशी करणाऱ्या इंगळे समितीने साडेदहा कोटींचा घोटाळा असल्याचे अहवालात नमूद केले. 

 

इंगळे समितीने ठपका ठेवलेले वितरक
अादित्य एंटरप्रायझेस, अक्षय कृषी सेवा केंद्र, अमित, अमोल यादव कृषी केंद्र, बालाजी, भारती, भूमाता अॅग्रो, चंद्रभागा ट्रेडर्स, चैतन्य, दीपक हार्डवेअर, जैन इरिगेशन, जलधारा ड्रीप, जलसिंचन, जितेंद्र अॅग्रो, कार्तिक अॅग्रो, मॅग अॅग्रो, महालक्ष्मी इरिगेशन, माऊली इरिगेशन, मागेश्वर, पांडुरंग साखर कारखाना, प्रिया इरिगेशन, राहुल एंटरप्रायझेस, साई एंटरप्रायझेस, शिवरत्न अॅग्रो, शिवरत्न इरिगेशन, शिवसिद्धी इरिगेशन, श्री विठ्ठल, श्री समर्थ, शुभम एजन्सीज, सिद्धी अॅग्रो, तेजस अॅग्रो, वैभव मशिनरी, विअर्ती ट्रेडर्स, किसान मशिनरी, यश इरिगेशन, यशराज कृषी सेवा केंद्र, अग्रणी एंटरप्रायझेस, अॅग्रोलीन एजन्सी, अहिल्या एंटरप्रायझेस, अविराज, भाळवणी, चंदन बावडा, दीपली अॅग्रो, दीपक एंटरप्रायझेस, दीपाली एंटरप्रायझेस, ड्रीप इंडिया, गांधी, गुरुप्रसाद, जय शीतल, जठार अॅग्रो, माळीनगर शुगर फॅक्टरी, नेटाफीम इरिगेशन, ओम इरिगेशन, पटेल ट्रेडर्स, पिराची कुरोली, रामदास इरिगेशन, साई अॅग्रो, समृद्धी इरिगेशन, शिवराज इरिगेशन, श्रद्धा एंटरप्रायझेस, साईनाथ इरिगेशन, विकास मशिनरी, विठ्ठल एंटरप्रायझेस, श्रीनाथ,दत्त, दीपक श्रीपूर, फार्मर, इंद्रजित, जैन महुद, मोनिका अॅग्रो, नेटाफीम, ओम एंटरप्रायझेस, ओम गायत्री, परफेक्ट अॅग्रो, सुपर, साई बावडा, श्री अॅग्रो, यशराज भाळवणी. अधिकारी: उपविभागीयकृषी अधिकारी : ए. पी. बरडे, एस. ए. भुजबळ, ए. आर. डुबल, अशोक किरनळ्ळी, के. एल. तुपलवंडे, पी. एन. दडस, यू. के. कांबळे, व्ही. जी. तांबे. तालुका कृषी अधिकारी : आबासाहेब धापते, मोहन रेळेकर, डी. आर. साठे, पी. बी नेटके. मंडलकृषी अधिकारी : बी.बी.चव्हाण, पी. बी. दडस, एम. बी. कट्टे, एम. एच. मिसाळ, व्ही. पी. पवार, एस. ए. सावंत, डी. आर. साठे, एम. ए. सावंत, पी. ए. सावंत, डी. बी. शिंदे, एस. पी. वाघ, डी. जे. शिंदे. याशिवाय तत्कालीन अधीक्षक कृषी अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील लिपीक यांनाही तपासात आरोपी केले जाणार आहे. 


इंगळे समितीने ठपका ठेवलेल्या कंपन्या 
जैनइरिगेशन, जळगाव, इये. पी. सी., नेटाफीम, परीक्षित, कोठारी, विशाखा, किसान, अॅक्वा, फिनोलेक्स, तुळशी, प्रिय इरिगेशन, मोहक, कृतदंड, हारवेल, सोना, रामदास, प्रगती आणि वेस्टअँड. 

बातम्या आणखी आहेत...