आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. साळुंखे, अभिनेता सचिनला यंदाचा दमाणी-पटेल पुरस्कार, 14 मार्चला वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील दमाणी पटेल प्रतिष्ठानतर्फे साहित्य व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.  साळुंखे आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती, प्रतिष्ठानचे समन्वयक बिपीनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
श्री. पटेल म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून दमाणी पटेल प्रतिष्ठानतर्फे ‘कर्मयोगी’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी मंगळवारी (दि. १४) सायंकाळी सहा वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पत्रकार परिषदेला दत्ता गायकवाड, अॅड. राजेंद्र घुली, मिरइसाक शेख, अवधूत कुलकर्णी, अक्षय जव्हेरी आदी उपस्थित होते. 

डॉ. साळुंखेंच्या विचारांचा, सचिनच्या कलेचा गौरव
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, व्याख्याते व संस्कृतचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठी विश्वकोषात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांमध्ये १०० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. दुसरे पुरस्कार विजते सचिन पिळगावकर यांचे चित्रपट क्षेत्रात यंदाचे ५० वे वर्ष आहे. त्यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट भूमिका केल्या. नुकत्याच गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटातील त्यांनी भूमिका विशेष गाजली. चित्रपट दिग्दर्शन, संगीत, नृत्यकला क्षेत्रातही त्यांचे विशेष योगदान आहे. सचिन यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कर्मयोगी’ पुरस्कार देण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...