आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपी चालकांविरुद्ध मोहीम सुरू, शहरात ३२ चौकांमध्ये नाकाबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून शहरातील बत्तीस ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्ह (मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर) कारवाई मोहीम सुरू केली अाहे. मोहीम महिनाभर असेल, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस अायुक्त महिपती इंदलकर यांनी दिली.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अाणखी वीस दिवस अाहेत. या कालावधीत काही तरुण वेगात वाहने चालवतात. मद्य प्राशन करतात. यामुळे अपघात होऊ नये यासाठी शहरातील महत्त्वाच्या बत्तीस चाैकात नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात येणार अाहे. कारवाई मोहिमेत कोण दोषी आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार अाहे. रात्रीच्या सुमाराला ही कारवाई राहील.

शहरातील तेरापैकी दोन सिग्नल चालू अाहेत. अकरा सिग्नल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली अाहे. मनपाने सिग्नल दुरुस्ती-देखभालचा मक्ता रद्द करून पुण्याच्या एका कंपनीला तात्पुराता मक्ता दिला अाहे. त्यांच्याकडून अजून सिग्नल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले नाही.

चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई
पत्रकार भवन चाैकात बुधवारी चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई झाली. अनेक वाहनधारक काचांवर काळी फ्रेम (टींट ग्लास) लावतात. यावर बंदी अाहे. पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई केली. शिवाय फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई झाल्याचे सांगण्यात अाले. दोन्ही कारवाईत सातत्य नसल्याने जरब बसत नाही.
बातम्या आणखी आहेत...