आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Changing Lifestyle Heart Attack On Age 20

सावधान ! बदलत्या जीवनशैलीमुळे विशीतच हृदयरोगाचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वी हृदयरोग हा ५० वर्षांनंतर उद्भवणारा आजार असे समजण्यात येत. बदलती जीवनशैली, आहार-विहाराची पद्धत तसेच कॉर्पोरेट पद्धतीमुळे मानवी जीवन वेगवान बनत आहे. वाढत्या तणावाने हृदयरोगाचा धोका २० वर्षांतील व्यक्तीत जाणवत आहे. साधारण १०० व्यक्तींमध्ये २५ जण हृदय रुग्ण आढळतात. या आजाराला रोखण्यासाठी सकस आहार, नियमित योग, व्यायाम आणि वेळेत औषधोपचाराची गरज आहे.

आधुनिक युगात स्पर्धात्मक जीवनामुळे प्रत्येकाला आरोग्याचे भान नाही असे चित्र आहे. प्रमाणाबाहेर फास्टफूड सेवनाने शरीरात चरबीबरोबर रक्तदाब मधुमेहाचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकस निर्माण होऊन हृदयरोग बळावतो. हृदयरोग हा मृत्यू देणाऱ्या आजारांतील एक आहे. यावर अनेक उपचार औषधे असली तरी वेळेचे भान नसेल तर व्यक्ती दगवू शकते. त्यामुळे छातीत दुखणे, दम लागणे, छाती भरून येणे, रक्तदाब मधुमेहाचे प्रमाण जास्त असेल तर हृदयरोग उदभवू शकतो. हृदयरोग टाळण्यास नियमित ध्यान, व्यायाम अथवा योग करण्याची गरज आहे.
पुढे वाचा.. हृदयरोगाचा वाढता धोका आणि वेळीच करा तपासणी