आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Corporators Yelling Standing Committee Meet Adjourned

यात्रेवरून स्थायीत स्टंटबाजी, सभा तहकूब करून नगरसेवकांची घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा प्रशासन मंदिर समितीत श्री सिद्धरामेश्वर यात्रेवरून सुरू असलेल्या वादंगाचे पडसाद मंगळवारी महापालिका स्थायी समितीच्या सभेत उमटले. भाजप आणि बसपा सदस्यांनी स्थायी सभा तहकूब करण्याची मागणी केली. यावरून मूळ विषय बाजूला राहिला अन दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली.

बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर हे समस्त सोलापूरकरांचे आहे. यात्रेसंदर्भात प्रशासनाची आडमुठी भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे राज्य सरकार यावर तोडगा काढत नाही. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सभा तहकूब करण्याची मागणी केली. तशीच मागणी भाजपचे सुरेश पाटील यांनीही केली. मुख्यमंत्री, पालकमंत्री, तुमचे, सत्ता तुमची, मग निषेध कोणाचा असा प्रश्न सत्ताधारी गटाने उपस्थित केला. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली.