आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या माहितीने चार जागांवर पोटनिवडणूक, निवडणुकीत अधिकाऱ्यांनी घातला घोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुदत संपल्यानंतर वा काही कारणामुळे पद रिक्त असल्याने सहा महिन्याच्या आत निवडणूक घेतली जाते. सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे तीन ग्रामपंचातीच्या चार जागांची पोटनिवडणूक लागली आहे तर पातेगाव खुर्द. ग्रामपंचायतीची मुदत संपूनही निवडणूक लागली नाही तर उजनी वसाहत ग्रामपंचायतीत आरक्षण चुकीचे कळविले आहे. या चुका लिपिक वा अव्वल कारकून यांच्या नसून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून झाल्या आहेत. खुद्द पदावरील ग्रामपंचायत सदस्यांनी खुलासा केल्यानंतर ही निवडणूक रद्द करावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे तर दुसरीकडे चुकीची माहिती सादर करणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना २० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचे समोर म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे.
उपमुख्य अधिकारी ग्रामपंचायत यांनी २५ मे २०१५ रोजी दिलेल्या अहवालानुसार बार्शी तालुक्यातील पांगरी जागा, मंगळवेढा तालुक्यातील मानेगाव बठाण येथील प्रत्येकी जागा, सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथील जागेची मुदत संपल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला याची माहिती कळविण्यात आल्याने चारही जागासाठी निवडणूक लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सदस्यांनीच याबाबत तक्रार केल्याने मुदत संपली नसल्याचे समोर आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच चुकीचा अहवाल दिल्याने निवडणूक जाहीर झाली.
प्रस्ताव देणार
चुकीच्या माहिती मि ळाल्याने पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुका रद्द करण्यासंबंधी निवडणूक आयोगास प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी दिली.
कोणती कारवाई होणार
पातेगावखुर्द ता. सांगोला ग्रामपंचातीची नोव्हेंबर २०१५ मध्ये मुदत संपली असताना त्याची मुदत २०१७ मध्ये संपणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. यामुळे या ग्रामपंचायतीची मुदत संपली असतानाही निवडणूक घेता आली नाही. शिवाय उजनी वसाहत ता.पंढरपूर येथील प्रभाग मधील जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित असल्याचे कळविले आहे. निवडणूक कामांमध्ये हलगर्जीपणा करणे चुकीची माहिती सादर केल्याबद्दल संबंधित अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार ? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...