आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Water Crisis Before Ten Days Examination Starts

पाणीटंचाईमुळे यंदा दहा दिवस अाधीच परीक्षा, पहिली ते आठवीची वार्षिक परीक्षा २९ मार्चपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील जिल्हा परिषद खासगी शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा २९ मार्चपासून घेण्यात येणार आहे. गतवर्षापेक्षा यंदा दहा दिवसाअाधी परीक्षा घेण्यात येत आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पाणीटंचाईत दिलासा मिळणार आहे. दरम्यान, वार्षिक परीक्षेत एप्रिल रोजी संकलित मूल्यमापन-२ चाचणीत प्रथम भाषा अाणि गणित विषयाची परीक्षा होणार आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे अनुक्रमे एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. पहिली मूल्यमापन चाचणी शाळा सुरू झाल्यावर काही दिवसांतच घेण्यात आली होती. अाता संकलित मूल्यमापन या चाचणीसाठी शाळांना राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. तसेच पायाभूत चाचणीप्रमाणेच संकलित चाचणीस अधिक कालावधी दिला जाणार आहे. प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा इतर दिवशी घेण्याबाबतचे नियोजन शालेयस्तरावर करायचे असल्याचे शिक्षण मंडळाने कळवले आहे.
दुष्काळामुळे शासनाचा निर्णय : शिक्षणविभागाने २९ मार्चपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी पहिली ते आठवीच्या परीक्षा १० दिवस लवकर होत आहेत.

मूल्यमापन चाचणीबाबत सूचना : पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजावून सांगावेत, चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून सांगावेत, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, प्रथम भाषा गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तयार करू नयेत, एकूण गुण पूर्णांकात द्यावेत, विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची नोंद ‘सरल’ या संगणक प्रणालीत करावी अादी सूचना दिल्या अाहेत.

अद्याप पत्र नाही
शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचणीचे अनुक्रमे एप्रिल रोजी आयोजन केले आहे. त्याप्रमाणे वार्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप याविषयी राज्य शिक्षण विभागाचे पत्र प्राप्त झालेले नाही. बी.जे. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी