आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरांतो एक्स्प्रेसला आता सोलापूर थांबा मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसला सोलापूरसाठी वाणिज्य थांबा मिळाला आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा प्रवास वेगाने धावणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसमधून होणार आहे. सिकंदराबादला जाण्यास शताब्दीला एक चांगला पर्याय मिळाला आहे. यापूर्वी सोलापूरला दुरांतो एक्स्प्रेसला केवळ ऑपरेटिंग थांबा होता. त्यामुळे या गाडीतून सोलापूरकरांना प्रवास करता येत नव्हता.
यापूर्वी आॅपरेटिंग थांबा देण्यात आलेल्या गाड्यांना संबंधित स्थानकांवर वाणिज्य थांबा देण्यात येणार असल्याचे नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. या संदर्भातील लेखी पत्र सोलापूर विभागाला प्राप्त झाले नसले तरी रेल्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख आले.

दुरांतो एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस धावते. कुर्ला स्थानकावरून ही गाडी रात्री ११.०५ वाजता निघून सोलापूरला पहाटे वाजता पोहोचते. मिनिटाचा थांबा घेऊन ती सिकंदरबादला सकाळी ११.०५ वाजता पोहोचते. सिकंदराबादला दिवसभर थांबून ही गाडी रात्री ११.०५ वाजता कुर्ल्यासाठी मार्गस्थ होते. सोलापूरला पहाटे ४.१२ वाजता येते. दोन मिनिटांचा थांबा असतो. यावेळी गाडीचे चालक गार्ड यांची ड्यूटी बदलण्यात येते. सोलापूरला वाणिज्य थांबा मिळाल्याने आरक्षण पद्धतीत बदल करून प्रवाशांना लवकरच गाडीचे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

^दुरांतो एक्स्प्रेसलासोलापूरसाठी थांबा मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी कधी होईल, हे निश्चित सांगता येणार नाही. मनिंदर सिंग उप्पल, अतिरिक्तविभागीय रेल्वे व्यवस्थापक