आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोजागरी पौर्णिमा: आदिमायेच्या ओढीने भक्त तुळजापूरला, मुलांसह युवा-युवतींचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुखी आदिमाया शक्तीचे नाव, कपाळावर कुंकवाचा मळवट आणि अनवाणी पावले एकच ध्यासाने भारावून तुळजाभवानीच्या वाटेवर जातानाचे चित्र दिवसभरात दिसले. गुरुवारी कोजागरी पौर्णिमा असल्याने शहर, जिल्ह्यासह परराज्यातील भाविक पायी बुधवारी निघाले. 
 
विजापूर रोड, होटगी रोड, पुना रोड आदी भागातून भाविकांचे जत्थेच्या जत्थे सकाळपासूनच शहरात दाखल होत तुळजापूरची वाट धरत होते. यात विजापूर रोड आणि होटगी रोडवरून येणाऱ्या भाविकांचा लोंढा जास्त होता. तसेच या विविध मार्गांवर या भाविकांच्या सेवेसाठी विविध दुर्गा माता मंडळांनी तसेच काही संस्था संघटनांनी चहा, नाष्टा, पाणी पाऊंच तसेच काही ठिकाणी मोफत जेवणाची अशी प्रसाद व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे या भाविकांमध्ये अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीपासून वयोवृद्ध तसेच महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसला. काही युवक, युवतीही हे थ्रील काय आहे? हे पाहण्यासाठी पायी जात होते. 
 
विविध भागातून भाविक तुळजापूर नाक्यावर तुळजापूर रोडचा रस्ता धरत होते. येथे काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा दिसला. वाहतूक वळवली असली तरी स्थानिक रहिवाशांच्या हट्टीपणामुळे या रहदारीचा भाविकांना त्रास होत होता. वाहतूक पोलिसांनी नियोजन सुरळीत केले होते. परंतु अनेक ठिकाणी दुचाकीधारक वाद घालत असतानाचे चित्र होते. 
 
रस्त्यावर कचराच कचरा 
तुळजापूर नाका ते पुढे सर्व रस्त्यावर प्रसाद दिलेल्या कचऱ्याचा ढीग तसाच पडून होता. तसेच या कचऱ्याचा भाविकांना चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले.
 
अंधारामुळेही अडचण 
मड्डी वस्तीपासून पुढे महामार्गावर लाइट नसल्याचा त्रास ही भाविकांना झाला. केवळ प्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांच्या लाइट आणि चंद्र प्रकाशात भाविक पायी मार्गक्रमण करत होते. 
 
भगव्या ध्वजासह सेल्फी स्टिक 
तसेया महायात्रेत सामील होणारा आपल्या मनोरंजनासाठी वॉकमन, हेडफोन, रेडिओ आदी करमणुकीची साधने घेऊन निघतो. पण यंदा बऱ्याच ठिकाणी पारंपरिक भगव्या झेंड्याच्या जोडीला कॉलेज तरुणांच्या हाती सेल्फी स्टिक दिसल्या. 
 
महापालिकेतर्फे आरोग्य तपासणी 
भाविकांसाठी महापालिकेतर्फे उपचारासाठी रूपाभवानी मंदिराजवळ केंद्र सुरू केले. त्याचे उद््घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आदी उपस्थित होते. डाॅ. जयंती अाडके, डाॅ. धीरज पाटील आदींनी उपचार केले. कचरा डब्यात टाकण्याची सोय महापालिकेने केली. प्लास्टिक कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मात्र, काही ठिकाणी कचरा रस्त्यावर पडून होता. 
 
 
बातम्या आणखी आहेत...