आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी ई-टीचिंग प्रणाली उपयुक्त ठरेल, शिक्षण मंडळाचे सभापती खटकेंचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डिजिटल युगातील शिक्षणातही अग्रेसर राहून विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी ई-टीचिंग प्रणाली उपयुक्त ठरेल, या अत्याधुनिक शिक्षण प्रणालीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन मनपा शिक्षण मंडळाचे सभापती व्यंकटेश खटके यांनी आज येथे केले. तसेच साने गुरुजी कथामालेच्या वतीने कॅम्प शाळेत कथाकथन स्पर्धा झाली.
कॅम्प शाळा येथे ई-टीचिंग सीडीचे वाटप विविध शाळांना करण्यात आले. यानिमित्त श्री. खटके बोलत होते. यावेळी पक्षनेते पांडुरंग चौधरी, शिक्षण मंडळाचे उपसभापती गोवर्धन कमटम, सदस्य अरुणा वर्मा, मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे, गांधी मेमोरिअलचे बी. जे. कुलकर्णी, योगीन गुर्जर, उपेंद्र ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. खटके म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या उपक्रमात शिक्षकांनी सहभाग दाखवल्यास आगामी काळात या गुणवत्तेत निश्चित वाढ होईल. शिक्षकांचे प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. अत्याधुनिक शिक्षण आणि मातृभाषा यांची उत्तम सांगड या ई-टीचिंगद्वारे घालण्यात आली आहे, पाश्चात्य देशात मातृभाषेत असे शिक्षण दिले जाते. ते गरजेचे आहे, असे मत गांधी मेमोरियलचे उपेंद्र ठकार बी. जे. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अत्याधुनिक प्रणाली
गांधी मेमोरिअल लायब्ररीच्या वतीने महापालिका शाळेत टीचिंग उपक्रम राबवण्यात आला. महापालिकेच्या ५९ शाळांना डीव्हीडी देण्यात आली. या शाळेतील पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे, त्याचबरोबर अत्याधुनिक प्रणालीही अंगिकारली पाहिजे. ई-टीचिंगच्या माध्यमातून हाच प्रयत्न शाळांपर्यंत पोचवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...