आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे एक हजार जणांनी साजरा केला ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुलीनेतयार केली मातीपासून गणेशाची मूर्ती. दहा दिवस त्याचे विधिवत पूजन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरीच पाण्याच्या भांड्यात त्याचे विसर्जन करण्यात आले. हे पाणी अंगणातल्या रोपांना दिले. इको फ्रेंडली गणेशोत्सवाला सोलापूरकरांनी साथ देत जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन केले.
शाडूच्या६०० मूर्ती विक्री
येथील मेकअवरनिड्स या ग्रुपने यंदाही शाडूच्या ६०० मूर्तींची अाॅनलाइन िवक्री केली. त्या सर्व मूर्तींचे विसर्जनही घरच्या घरी करण्यात अाले. या ग्रुपच्या प्रमुख शर्मिला करपे यांनीही घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन केले. गेल्यावर्षीही या ग्रुपने असाच उपक्रम राबविला होता. मूर्तिकार सगर यांनी या मूर्ती बनविल्या होत्या. मेकअवरनिड्स या वेबसाईटवर इकोफ्रेंडली गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात अाली.

सरगम कुटुंबीय
सरगम कुटुंबीयांनी निसर्गाचे या पद्धतीने रक्षण केले. त्यांच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा होतीच, त्याने इतरांना प्रेरणाही मिळाली. हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलच्या युनिक टाऊनमध्ये हे कुटुंब आहे. नागेश सरगम हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातही ते पर्यावरणाचे भान ठेवतात. प्लास्टिक कपांतून चहा देणे बंद केले.

साध्या कागदी कपांचा वापर करतात. त्यांचेच अनुकरण त्यांच्या मुलीने केले. तिने मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती बनवली. त्याचे विसर्जनही घरच्या घरीच केले. श्रावणी सरगम हिने अंगणात रंगावली काढून त्यावर पाण्याचे पातेले ठेवले. ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ असे म्हणत मूर्ती या पातेल्यात बुडवली. काही वेळातच मूर्ती पूर्णपणे पाण्यात विरघळली. त्यानंतर त्याचे पाणी परसातल्या बागेतील राेपांना देण्यात आले. छोटी-छाेटी रोपेही या वेळी लावली.

सोलापुरातील वन खात्यातील संजय भोईटे हे पर्यावरणाचे पुरस्कर्ते आहेत. पत्नी अनिता भोईटे त्यांची मुले मनाली, ओंकार आणि यश यांनी घरच्या घरी विसर्जन सोहळा आयोजिला. बागेतल्या मातीतूनच बाप्पा साकारले होते. विसर्जनानंतर त्या जागीच छानसे रोपटेही रूजविले. ‘दिव्य मराठी’ने घरच्या घरी विसर्जनाची सुचिवलेली कल्पना संजय भोईटे यांच्या घरात आधीपासूनच एक परंपरा बनली आहे, याचे उत्तम उदाहरण यातून दिसून आले.

घरच्या घरी विसर्जनाची संकल्पना अंगिकारली
^घरगुती गणेशविसर्जनाचा पर्याय गेल्या चार पाच वर्षापासून स्वीकारला आहे. वन आणि जंगल यांच्या सान्निध्यात राहून संजय भोईटे हे पर्यावरण रक्षण, संरक्षणाचे अनमोल कार्य करतात. पर्यावरण पूरक जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. गणेशाेत्सव काळात त्यांनी इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना केली. आरास ही पर्यावरण पूरक केली. विसर्जनही घरच्या घरी एका स्टीलच्या टाकीत केले.” अनिता भोईटेे, सोलापूर

वनखात्यातील संजय भोईटे त्यांच्या कुटुंबीय घरच्या घरी बाप्पांचे विसर्जन सोहळ्यात.
मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर रोपांना पाणी देताना नागेश सरगम आणि मुलगी श्रावणी सरगम.

पुढच्या वर्षीच्या २०० मूर्तींचे बुकिंग
^यावर्षी अष्टविनायकप्रकारातील १५० छोट्या मूर्ती बनविल्या होत्या, त्या घरगुती गणेशोत्सवात स्थापन झाल्या. घरच्या घरी विसर्जितही झाल्या. शिवाय ५० मोठ्या मूर्तीही शाडूच्या बनविल्या होत्या. त्याचेही विसर्जन अाॅफिस, माॅल, मोठे दुकान या िठकाणी बसविल्या त्याच िठकाणी करण्यात अाले. या सर्व मूर्ती शास्त्रोक्त पध्दतीने बनविल्या होत्या. पंचांगकर्ते मोहन दाते यांनीही या मूर्तींचे कौतुक केले. पुढच्या वर्षीसाठी २०० शाडूच्या मूर्तींचे आताच बुकिंग झाले अाहे. पुढच्या वर्षीचा प्रतिसाद यापेक्षा अधिक चांगला अाहे.” मधुरसोलापूरकर, मूर्तिकार

लोकांमध्ये जागृती वाढली
^यावर्षी छोट्या अाणि मोठ्या अशा ५० शाडूच्या मूर्ती बनविल्या होत्या. त्या सर्व गणेशभक्तांनी विकत नेल्या. घरच्या घरी बकेटमध्ये विसर्जन करा, असे त्यांना मूर्ती नेतानाच सांगितले होते. बहुतेकांनी तसेच केले. काही जणांनी व्हाॅटसअॅपवर घरच्या घरी मूर्ती िवसर्जन केल्याचे फोटो शेअर केले अाहेत. गेल्या पाच वर्षापासून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवित अाहे. वरचेवर प्रतिसाद वाढतो अाहे. अनेक मोठ्या कार्यालयांमध्येही या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात अाली होती.” विकासगोसावी, मूर्तिकार
बातम्या आणखी आहेत...