आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ऐ अल्लाह, अमन, खुशहाली रख'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन चांगले अधिकारी व्हावेत, प्रशासकीय सेवेत या. देवालाही हेवा वाटावा असे चारित्र्य जपा, असे विचार अॅड. अब्बास काझी यांनी येथे व्यक्त केले.
शाही आलमगीर ईदगाह, पानगल हायस्कूल येथे श्री. काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो बांधवानी नमाज अदा केली. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशात, शहरात, समाजात, घरात भाईचारा वाढावा. जात-पात मानता एक माणूस आहे याची जाणीव ठेवा. एकमेकांशी भावासारखे आपले आचरण असू दे. सर्व जाती-धर्मातील लोकांनी दोन पाऊल पुढे आल्यास दहा पावले पुढे येतील आणि एकोपा वाढेल. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी व्हा. सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य लाभू दे. यावेळी मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम बांधवांच्या प्रगतीसाठी आरक्षण दिले पाहिजे, असे आवाहन करत हिंदू-मुस्लिम समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, असे संदेश शहर काझी अमजद अली सय्यद यांनी दिला. होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह मैदान येथे रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. यानंतर मार्गदर्शन करताना शहर काझी बोलत होते. सर्व प्रथम त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रोजा हे प्रेमाचे नाव आहे तर कुराण हे सर्वस्व आहे. मानवी जीवनाचे सार त्यात आहे. आज काही जण हिंदू-मुस्लिममध्ये दरी निर्माण करत आहेत. मुस्लिम बांधवांवर संशय नको, असेही ते म्हणाले. यावेळी हजारो मुस्लिम समाजबांधवांनी सामूहिक नमाज पठणात सहभाग घेतला.

"ऐअल्लाह तू कृपाळू आहेस, दयाळू आहे, आमच्या देशात शांतता सुवस्था अबाधित ठेव, देशाची प्रगती कर, लाभदायक पाऊस दे, तरुणांना रोजगार दे, सर्वांना सद्बुध्दी दे...' अशी प्रार्थना शहरातील मौलवींनी शनिवारी रमजान ईदच्या नमाजनंतर ईश्वरचरणी केली. सामूहिक नमाज पठणानंतर "ईद मुबारक हो,’ असे म्हणून मुस्लिम समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

रमजान ईदचा सण शनिवारी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी पाच ईदगाह मस्जिदमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर शहर काझी मौलावी यांनी ईदचा संदेश देण्याबरोबर सामाजिक शांतता सुव्यवस्थेबाबत प्रार्थना केली. नमाजनंतर मुस्लिमबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदच्या तयारीची लगबग सुरू झाली. शनिवारी सकाळपासून ईदगाह मैदानावर मुस्लिमबांधवांची गर्दी होती. लहान मुलांची संख्याही लक्षणीय होती. कुर्ता परिधान केलेले बच्चे कंपनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ईदगाहच्या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
पाचईदगाहवर नमाज पठण अहेलेहदिस ईदगाह (रंगभवन) येथे अब्दुल नाफे काझी, शाही आलमगीर ईदगाह (पानगल प्रशाला) येथे अॅड. सय्यद अब्बासअली काझी, आदिलशाह ईदगाह (जुनी मिल कंपाऊंड)येथे फजलुल्लाह खतीब, आलमगीर ईदगाह (होटगी रस्ता) येथे मुफ्ती सय्यद अमजदअली काझी, आसार मैदान ईदगाह येथे अ. सलाम रजवी यांनी ईदची नमाज पठण केली. पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता.

‘त्या’ संघटनेशी मुस्लिम बांधवांचा संबंध नाही
आयएसआयएसया संघटनेशी मुस्लिम बांधवांचा काही संबंध नाही. आपण मुस्लिम बांधवांच्या बाजूने आहोत म्हणून संघटना दिखावा करते. त्यांच्यामुळे समाज बदनाम होतोय. त्यांना थारा देऊ नये. संघटनेच्या हल्ल्यात इस्त्राईलमध्ये निष्पाप आई, बहीण, मुले अनेक पालकांचा बळी गेला. रक्तरंजित कामे ते करताहेत असे सांगताना श्री. काझी यांचा कंठ दाटून आला.
अॅड. अब्बास काझी

जिल्हा कारागृहात नमाज अदा
चुकामाणसाच्या हातून होतात. ती सुधारून जीवनात यशस्वी होणाराच खरा माणूस, असे मत हाजी उस्मान जमादार यांनी जिल्हा कारागृहातील कैद्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते २३ वर्षापासून नमाज पठण करतात. कारागृहात तुम्हाला सुधारण्याची संधी प्राप्त झाली आहे. यापुढे गुन्हा घडणार नाही अशी शपथ घ्या. गुन्हा केल्याबद्दल माफी मागा, असे हाजी जमादार यांनी म्हणाले. यावेळी हाजी सरदार नवास शरीफ, महमद शरीफ वलोयोद्दीन भागानगरी उपस्थित होते. सुमारे सव्वीस कैद्यांनी उपवास ठेवला होता. त्यांना दररोज रात्री पहाटे जेवण देण्यात येते होते. फ़ळे, खजूर याचाही त्यात समावेश होता. रमजानसाठी खास बरॅकही केला होता. यावेळी मुख्य जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कुलकर्णी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी वाय. बी. फड, तुरुंग अधिकारी डी. एम. उमक उपस्थित होते.
पाऊस पडण्यासाठी रडून प्रार्थना
सामुदायिकप्रार्थनेत पेश ईमाम (मुख्य धर्मगुरू) यांनी खुत्बा म्हणजे कौटुंबिक, सामाजिक आध्यात्मिक कर्तव्यांचा उपदेश केला. तसेच लाभदायक पावसाकरिता रडून रडून प्रार्थना करण्यात आली. यंदा पाचही ईदगाहच्या ठिकाणी पोलिसांनी गुलाबाचे पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रंगभवन ईदगाह येथे नेहमीप्रमाणे महिलांच्या नमाजकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. नमाजनंतर मुस्लिम समाजबांधवांनी सढळ हाताने जकात दिली.

जीवनात बदल घडावा
माणसाच्याहातून चुका होतात. त्यातून सुधारणा होते. जीवनात बदल घडावा अशी अपेक्षा आहे. ईदसाठी महिनाभर कारागृहात उपक्रम घेतले. आज सर्वांना शिरखुर्मा देण्यात आला. अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...