आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षण मंडळ सभापती निवडीला स्थगिती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती प्रा. व्यंकटेश कटके यांच्यावरील अविश्वास मान्य झाल्याने, नवीन सभापती निवड मंगळवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे. या निवडीला स्थगिती आणण्याचे प्रयत्न झाले. सभापती प्रा. कटके यांनी उच्च न्यायालयात सभापती पदाबाबत याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. पण सभापती निवडीला स्थगिती मिळाली नाही, अशी माहिती अॅड. विश्वास देवकर यांनी दिली. महापालिका शिक्षण मंडळाची सभापती निवडीसाठी उपसभापती गोवर्धन कमटम यांनी सभा बोलवली आहे. काँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपचे तीन सदस्य आहेत. काँग्रेसचे पारडे जड आहे. पांडुरंग चौधरी गोवर्धन कमटम काँग्रेसकडून तर राष्ट्रवादीकडून अरुणा वर्मा जाविद खैरादी, भाजपकडून शशी थोरात, दत्तात्रय गणपा हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून संकेत पिसे यांना हिरवा कंदील मिळाला असला तरी मंडळातील पाच सदस्यांनी विरोध केला आहे.
बातम्या आणखी आहेत...