आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्ल्यू व्हेल गेम'च्या मायाजालावर पालकांसाठी प्रबोधन मिशन, शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ’ब्ल्यूव्हेल गेम’च्या मायाजालात शाळेतील इतर मुले सापडलीत का? याची चाचपणी समीरच्या शाळेने सुरू केली. समीरसह त्याचा मित्र पालकांना शाळेत बोलावून घटनेची माहिती जाणून घेतली. २० तारखेपर्यंत मुलांना मोबाइल हाताळण्यास देऊ नये, असे अावाहनही पालकांना शाळेने केले. दरम्यान ब्ल्यू व्हेल गेमच्या धोक्याचे गांभीर्य अोळखून जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी सर्व शाळांना सतर्कता म्हणून पालक बैठका घेऊन प्रबोधन करण्यात येईल, असे सांगितले. 
 
ब्ल्यू व्हेल गेमच्या पाशात अडकल्यानंतर बसमधून पुण्याकडे निघालेला समीर पालकांच्या स्वाधीन सुखरूप पोहोचला. परंतु अशी घटना घडू नये, यासाठी जुळे सोलापुरातील शाळा व्यवस्थापन शिक्षणाधिकारी कार्यालय खडबडून जागे झाले अाहे. शाळेने समीर त्याच्या जवळच्या मित्रांसह पालकांना शुक्रवारी शाळेत बोलावून घेतले होते. “ब्ल्यू व्हेल गेम कोण कोण खेळतात?’ याबाबत विचारणा केली. मुलांना मोबाइल हाताळण्यास देऊ नका. दोन दिवसांत परीक्षा अाहेत. २० ऑगस्टपर्यंत परीक्षा चालेल. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन होईल, असे सांगितले. 
 
शाळांना पत्र पाठवणार 
सर्व शाळांना पत्र पाठवून मुलांसोबतच पालकांचे ब्ल्यू व्हेल गेमच्या धोक्यासंदर्भातील प्रबोधन करावे, अशा अाशयाचे पत्र तातडीने पाठवणार अाहोत. - सत्यवान सोनवणे, जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक 
 
डॉक्टरांचा सल्ला 
पालकांनी मुलांना वेळ द्यावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. काल्पनिक जग आणि सत्य काय? हे उमजून सांगावे. मुलांमध्ये अचानक बदल जाणवला तर शांत बसता मुलांशी संवाद साधावा. ब्ल्यू व्हेल गेमच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांनाच टार्गेट केले जाते, हे समजावणे अावश्यक आहे. 
- डॉ. प्रसन्न खटावकर, मानसोपचार तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...