आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरावीक दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांना शाळा लावतात तगादा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शाळा,महाविद्यालये आठवड्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. परंतु ठरावीक दुकानांतूनच शालेय साहित्याच्या खरेदीचा निर्बंध शाळांना घातल्याने पालकांची गोची झाली आहे. बहुतेक इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळाचालकांकडून तसा तगादा लावला जातो. शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करून शिक्षण संस्था आणि दुकानदारांच्या मिलिभगतमधून हा प्रकार सुरू आहे. या प्रकारामुळे पालकांची कशी अर्थिक लूट होते यावर ‘डीबी स्टार’ने टाकलेला हा प्रकाश...

शहर जिल्ह्यात २२५ हून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळेचे शिक्षण संस्थाचालक दुकानदार यांच्यात मिलिभगत असल्याचा संशय आहे. त्यामुळे शाळांकडून ठरावीक दुकानातूनच ड्रेस आणि शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. पालकांना नाइलाजाने या दुकानात जावे लागते. हे दुकानदार आपल्याशिवाय ग्राहक कुठे जाणार नाही म्हणून इतर दुकानांपेक्षा साधारण १० ते १५ टक्के रक्कम जास्त दर लावून वस्तूची विक्री करतात, तर काही शाळा स्वत: अशा साहित्याची विक्री करतात. या प्रकारामुळे पालकांची अर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे.
श्रीपादकुंदूर,सरस्वती बुकडेपो
शहरातील बहुतांश दुकानांनी शाळांबरोबर टायप केला आहे. त्यामुळे पालकही शाळांनी सांगितलेल्या दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. कारण संबंधित शाळांना दुकानाकडून कमिशनचे पैसे मिळतात. आम्ही कोणत्याचा शाळा अथवा शिक्षकाबरोबर टायप केले नाही.
शाळांना समज देणार
एस.चंदनशिवे,उपशिक्षणाधिकारीमाध्यमिक विभाग
पालकांना ठरवून दिलेल्या दुकानातून साहित्या घेण्यास लावणे चुकीचे आहे. याबाबत पालकांनी तक्रार केल्यास संबंधित शाळांना समज देण्यात येईल. मुळात असे बंधन कुठल्याच शाळांना करता येणार नाही. पालकांनी लगेच माध्यमिक शिक्षण विभागाशी संपर्क करावा.

जादादराने केली जाते विक्री
अजयबंडगर, पालक
शाळामध्ये पुस्तके घ्या अथवा ठरवून दिलेल्या दुकानातून साहित्य घेण्यास सांगतात, त्यामुळे पालकांचा वेळ पैसा वाया जातो. शिवाय पालकांना सूट दिली जात नाही. इतर दुकानात त्याच वस्तू कमी दरात मिळतात.
सक्ती अयोग्य
अमोलजोशी,सचिव आयएमएस
^आयएमएसशाळेमधूनसीबीएसई स्टेट बोर्डनुसार शाळेतूनच पुस्तके देण्यात येतात. कारण सीबीएसईची पुस्तके सहजा सहजी दुकानात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शाळा पालकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविते. इतर शैक्षणिक साहित्य ठरावीक दुकानातूनच आणण्याचा आग्रह केला जात नाही.
स्वस्तात साहित्य द्या
तानाजीमाने, अध्यक्षमुख्याध्यापक संघटना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जास्तीचे साहित्य खरेदी करतात. त्यामुळे पालकांच्या हातात स्वस्तात देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तसेच, विशिष्ट दुकानातूनच साहित्य घ्या असा अग्रह धरला तर बाजारपेठेतील किमतीप्रमाणे साहित्यांची विक्री झाली पाहिजे. त्यातून पालकांची अर्थिक लूट होणार नाही. आरटीईचे कायद्याचे उल्लंघन आहे.
आरटीईचे उल्लघंन
श्यामवाघमारे, आरटीईकार्यकर्ता
^ठरवूनदिलेल्यादुकानातूनच साहित्य खरेदी करण्यास लावणे हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा नियमबाह्या पध्दतीने हा प्रकार सुरू आहे. शाळेतून िकंवा ठरवून दिलेल्या दुकानातील शैक्षणिक साहित्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते. दुकानवाले पालकांनी खरेदी केलेल्या साहित्यातून कमिशन देतात.
यामुळे शाळांकडून होते सक्ती
साधारणदहा वर्षांपासून शासनाकडून अनुदानित शाळा, संस्थांना शिक्षणेतर अनुदान बंद करण्यात आले आहे. अशा स्वरूपाचे अनुदान बंद केल्याने शाळांना क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांसाठी निधीची गरज म्हणून प्रायोजक शोधावे लागत आहेत. शैक्षणिक साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या संबंधातून असे प्रायोजक मिळविण्यासाठी काही शाळा पालकांना ठरावीक दुकानांतून साहित्य करण्याची सक्ती करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुस्तकांबरोबरच वह्यांची सक्ती
शाळांनीठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तके घेण्यासाठी सांगितले जाते. दुकानात गेल्यानंतर पुस्तकांबरोबरच वह्याही घ्याव्या लागतात, असे सांगितले जाते. उदाहरणार्थ वीच्या वर्गाची पुस्तके घेण्यासाठी गेल्यानंतर वह्याही त्याच दुकानातून आग्रह धरला जातो. यामुळे पालकांचे जास्तीचे पैसे जात आहेत. ठरवून दिलेल्या दुकानात फक्त वह्यांवर १० टक्के सूट दिली जात आहे. इतर वस्तूवर काहीच सूट नाही.
ठरावीक दुकानातूनच आग्रह का?
साधारणएका विद्यार्थ्याला संपूर्ण शैक्षणिक वर्षात गणवेश, बॅग, शूज, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, कंपास, पाटी, वॉटर बॅग, कॅमलीन रंग, चित्रकला वही आदी साहित्य लागते. सर्वच शैक्षणिक दुकानातून शालेय साहित्यांची विक्री केली जाते. परंतु शाळांकडून ठरावीक दुकानातून ड्रेस घ्या, शैक्षणिक साहित्य आणा असे सांगितले जाते. अधिकची कटकट नको म्हणून पालक महाग असूनही आर्थिक झळ सोसून शाळांनी सांगितलेल्या दुकानातून साहित्य घेताना दिसतात.
बातम्या आणखी आहेत...