आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समावेशक मराठी भाषेचे निर्माण नाही; हा तर व्यवस्थेचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राज्यातील सर्वच मराठी भाषकांसाठी सर्वसमावेशक एकच मराठी भाषा निर्माण करता आलेली नाही, हा देखील शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली. दरम्यान मंगळवारी (दि. ८) तीन दिवशीय मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक संमेलनाचा समारोप झाला.

समारोपाच्या अगोदर अायोजित व्याख्यानाच्या सत्रात कांबळे यांचे व्याख्यान झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष एम. डी. देशमुख, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, मुख्याध्यापक महामंडळाचे रावसाहेब आवारी, अध्यक्ष मारोती खेडेकर, मराठावाडा संघाचे अध्यक्ष युनुस शेख, सचिव दिलीप धुमाळ, उपाध्यक्ष गोविंद मुंडे, दिलीप पाटील, उस्मानाबादच्या संघाचे अध्यक्ष डी. डी. शेरे, उपाध्यक्ष एम. जी. बनसोडे, सुरेश टेकाळे, सचिव डी. एच. पाटील, कोषाध्यक्ष जी. सी. नेरे, ए. टी. माने, एस. डी. कुंभार, डी. के. कुलकर्णी उपस्थित होते.

पत्रकार कांबळे म्हणाले की, मराठवाडा, खानदेश, कोल्हापूर आदी ठिकाणी मराठी भाषा बदलते. वेगवेगळ्या भागात भाषा एकच मराठी असावी यासाठी सक्षम शिक्षण व्यवस्था असणे आवश्यक आहे. आतापर्यंत भटजीचा, क्ष क्षत्रियाचा, ओझेवाल्याचे असे शिक्षण देऊन बालवयातच जातीय वर्ण व्यवस्थेचे शिक्षण देण्यात येत आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. आता सर्वत्र आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. यामुळे शिक्षकच लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या व्यवस्थेत शिक्षक टिकणे आवश्यक आहे. शिक्षणातील प्रयोगशीलता संपली यामुळे गोडीही संपली आहे. यामुळे आताही मुले रडत शाळेत जातात. गुणवत्तेची गॅरंटी खासगी शाळा देऊ शकतात मग जिल्हा परिषद शाळांमध्ये अशी खात्री का दिली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘शिक्षणाधिकाऱ्यांना घाबरू नका’ :शासन कितीतरी जीआर काढून मुख्याध्यापकांना वेठीस धरत आहे. मात्र, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना नाही. यामुळे त्यांना घाबरू नका, असा आश्चर्यकारक सल्ला आमदार काळे यांनी भाषणात दिल्याने खळबळ उडाली. मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा अधिकार संस्थाचालकांना असतो. शासनाचे दिवस आताच भरले आहेत. आपलेही दिवस कधीतरी येतील. मुख्याध्यापकांनी घाबरता प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड द्यावे. या संमेलनातून हा संदेश प्रत्येकांनी घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, करड्या शिस्तीचे विद्यार्थीप्रिय रुईभरचे दिवंगत मुख्याध्यापक अनिल सारंग कमलाकर पवार यांचे सभागृहाला नाव देऊन त्यांना वेगळी आदरांजली वाहन्यात आली. संमेलनासाठी उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच भोजन, फोटो आदीचे व्यवस्थापन करण्याऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

‘मन वाचायला शिका’
पुस्तकांसोबत मुख्याध्यापक शिक्षकांनी मन वाचायला शिकणे आवश्यक आहे, असे मत संमेलनाध्यक्ष एम. डी. देशमुख यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात काय सुरू आहे. हे वाचता आले तर चांगले अध्ययन अध्यापन होऊ शकते. कोणत्याही समस्येला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहावे.

पाच लाखांची उलाढाल
कार्यक्रम स्थळावर विविध शालेय, नामवंत लेखकांची पुस्तके ४० स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात आले हाेते. यातून सुमारे पाच लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. हस्ताक्षर सुधारणे, १० १२ वी परीक्षेबाबत मार्गदर्शन, वैज्ञानिक स्वरुपाच्या पुस्तकांना मुख्याध्यापक उस्मानाबादच्या नागरिकांनी पसंती दिली.

संमेलनाच्या संयोजकांनी सत्काराच्या वेळी विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार विसरला. यामुळे विदर्भ विभागातील सर्वच मुख्याध्यापक चांगलेच चवताळले होते. त्यांनी व्यासपीठ सभागृहातही या बद्दल रोष व्यक्त केला. सर्वच वक्त्यांनी या प्रकारावर भाष्य करून माफी मागितली. आमदार काळे यांनीही आपल्या भाषणातील ५० टक्के वेळ या मुद्द्यावर खर्च केला.

काही ठराव
{शालेय गुणवत्तेसाठी संहितेनुसार शिक्षक संच मान्यता द्यावी.
{९ १० वीला सरसकट तीन शिक्षकांची पदे मान्य करावीत.
{शाळा तेथे मुख्याध्यापक द्यावा, संख्येचे बंधन टाकण्यात येऊ नये.
{वेतन आयोगाच्या श्रेणीचे निकष ठरविताना मुख्याधपक महामंडळाला बोलवा.
बातम्या आणखी आहेत...