आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Khadse In Pandharpur For Kartika Ekadashi

महाराष्ट्र दुष्काळमुक्त कर, एकनाथ खडसे यांचे पांडुरंगाला साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - बा विठ्ठला, सततचा दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या संकटांतून राज्याला मुक्त कर, राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना श्री विठ्ठलाकडे केल्याचे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त रविवारी पहाटे खडसे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. या पूजेवेळी नाशिक जिल्ह्यातील दामोदर रतन सोमासे (वय ८५, रा. जादुवाडी, ता. मालेगाव) व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सामोसे (७८) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला. महापूजेनंतर मंदिर समितीतर्फे आयोजित समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
खडसे म्हणाले, पंढरपुरातील यात्रांना दरवर्षी लाखो वारकरी येण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांची चांगली व्यवस्था व्यवस्था व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शहरावर वाढणाऱ्या सर्व प्रकारच्या नागरी सेवांचा ताण कमी करण्याचाही प्रयत्न आहे. ६५ एकरात वारकऱ्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे पंढरपूरचे उपनगर उभे राहावे. तसेच गटारी, पाणीपुरवठा, शौचालयाची कायमस्वरुपी व्यवस्था केली जात आहे. वाळवंटात भजन, कीर्तन करणाऱ्या भाविकांना ते येथे करता येईल. संतविचाराचा ठेवा व संस्कार पुढील पिढी पोहोचवण्यासाठी संत विद्यापीठाची आवश्यकता आहे. त्यासाठी जागा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, उल्हास पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, व्यवस्थापक विलास महाजन उपस्थित होते.
भाविकांची संख्या कमी, यात्रेवर परिणाम : मागील तीन - चार कार्तिकी यात्रांच्या तुलनेत यंदा दुष्काळ, महागाईमुळे यात्रेसाठी भाविकांची संख्या घटल्याचे यात्रेदिवशीही िदसले. त्यामुळे यंदा उलाढालही कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पदस्पर्श दर्शनासाठी तेरा तासांचा कालावधी : श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग एकादशी दिवशी रविवारी (दि. २२) सायंकाळी गोपाळपूर रस्त्यावरील सहाव्या पत्राशेडपर्यंत गेली होती. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविकांना १३ ते १४ तासांनंतर श्री विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घडत होते. अतिक्रमण हटवल्यामुळे यंदा रस्ते प्रशस्त झाले आहेत. मात्र, यात्रेसाठी गर्दीच्या तुलनेत पोलिस बंदोबस्त कमी होता. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची पाकिटे, मोबाईल, महिलांची मंगळसूत्रे पळविल्याच्या घटना घडल्या. परंतु याबाबत फारसे गुन्हे दाखल झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंदिर समितीकडून सत्कार : मंदिर समितीचे सभापती मुंडे यांच्या हस्ते खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा सत्कार झाला. पूजेवेळचे वारकरी प्रतिनिधी दामोदर सोमासे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन खडसे दाम्पत्यांच्या हस्ते सत्कार झाला. मंदिर समितीने सोमासे दाम्पत्याला वर्षभर राज्यात फिरण्यासाठी मोफत एसटी प्रवास पासही देण्यात आला.
नाशिकच्या सोमासे दाम्पत्यास महापूजेचा मान
मंदिर समितीचे सभापती मुंडे यांच्या हस्ते खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा सत्कार झाला. पूजेवेळचे वारकरी प्रतिनिधी दामोदर सोमासे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन खडसे दाम्पत्यांच्या हस्ते सत्कार झाला. मंिदर समितीने सोमासे दाम्पत्याला वर्षभर राज्यात फिरण्यासाठी मोफत एसटी प्रवास पासही दिला आहे.