आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मतदार ओळखपत्र रंगीत, प्लास्टिकचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणूक आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज, मतदान अोळखपत्रामध्ये मोठा बदल केला आहे. आता रंगीत मतदार ओळखपत्र दिले जाणार आहे. तसेच ते कार्ड प्लास्टिकचे असणार आहे. 
 
नवीन मतदार नोंदणी जुलैपासून सुरू होणार आहे. त्यांना रंगीतच मतदार ओळखपत्र मिळणार आहे. नव्या ओळखत्रात बोगसगिरीला आळा घालण्यासाठी उपाय केले आहेत. इंग्रजी प्रादेशिक भाषेत मजकूर असेल. मतदाराचा रंगीत फोटो, बारकोडमध्ये कार्ड क्रमांक असणार आहे. सर्व जुने कृष्णधवल ओळखपत्र रद्द करून त्यांनाही नवे ओळखपत्र देण्याचे नियोजन अाहे. 

भोपाळमध्ये छपाई 
प्लास्टिक कार्डवर छपाई करण्याचे काम भोपाळ येथील अतिशय इन्फोटेकला मिळाले आहे. जिल्हास्तरावर पुरवठा करण्यात येणार आहे. मतदारांकडून नवीन नाव नोंदणी वा कार्डामध्ये दुरुस्तीची माहिती कंपनीला जिल्हास्तरीय मंजुरीनंतर देण्यात येईल. नवे ओळखपत्र जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयांना कंपनीने पाठवले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून हे मतदारांना वाटप केले जातील. दर मंगळवारी याचा आढावा घेण्यात येणार आहे. 

जुलैपासून वाटप 
^निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार माहिती गोळा केली जात आहे. यापुढील काळात नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या मतदारास प्लास्टिक व्होटर कार्ड देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे कृष्णधवल ओळखपत्र आहे, त्यांना नवीन कार्ड देण्याबाबतचा विचार आहे. जुलैपासून नवीन मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे.” सतीशधुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी 

 
बातम्या आणखी आहेत...