आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी हालचाली वाढल्या,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
नगरपालिका निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यातील विविध जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटातील इच्छुक उमेदवार कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी शनिवारी (दि. १०) संवाद साधला. आमदार राणाजगजितसिंह पाटील, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, तालुकाध्यक्ष गफार काझी यांनी सर्वांची मते जाणून घेतली. इच्छुक उमेदवारांकडून आता अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र, अन्य पक्षांनीही संघटन मजबूत केले आहे. यामुळे विशेष चाचपणी करूनच उमेदवार देण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. बेंबळी, पाडोळी (आ.), वडगाव (सि.), अंबेजवळगा येथील गट यातील गणांवर पक्षाने यावेळी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपनेमागवले अर्ज : निवडणुकीसाठीभाजपने इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात केली. तालुकाध्यक्षांकडे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून या अर्जांद्वारेच पक्षाकडे उमेदवारीची मागणी नोंदवावी लागणार आहे. यामुळे तातडीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...