आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा बिगुल, 25 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाची नवी सिनेट स्थापन करण्यासाठी येत्या २५ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात १० प्राचार्य, सहा संस्था प्रतिनिधी, दहा शिक्षक, दहा पदवीधर, तीन विद्यापीठ शिक्षक असे एकूण ३९ सदस्य निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. 
 
२५ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान : सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही मतदानाची वेळ असेल. यासाठी सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. मंगळवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील. १४ सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निघेल. प्रचाराद्वारे मोर्चेबांधणी आणि राजकीय, संघटनात्मक हालचालींना सुरुवात होईल. २६, २७ २८ सप्टेंबर असे तीन दिवस मोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत.

 
महिलांसाठी प्रत्येक प्रवर्गात एक जागा राखीव : अधिसभा सदस्यांसाठी आरक्षणनिहाय निवडणूक होईल. एक प्राचार्य, एक संस्था प्रतिनिधी, एक शिक्षक, एक पदवीधर महिला, एक विद्यापीठ शिक्षक इतकी पदे महिलांसाठी राखीव असतील. 
 
कुलगुरू नियुक्त सदस्यांची निवड यापूर्वीच घोषीत करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्व प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक वेळापत्रकानुसार विद्या परिषद तसेच अभ्यासमंडळाचीही निवडणूक घेतली जाणार आहे. विद्यापरिषदेवर प्रत्येक विद्याशाखेचे दोन दोन शिक्षक असतील. तर अभ्यासमंडळावर तीन महाविद्यालयीन, मान्यताप्राप्त संस्थांमधील विभागप्रमुखांची निवड होईल. 
 
सिनेट, अभ्यास मंडळ निवडी बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. सिद्राम सलवदे सरचिटणीस डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी मांडली आहे. प्राध्यापकांनी नवसमाज घडवताना विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा. प्राध्यापकांमधील ज्या जागा आहेत, त्या राजकीय करता बिनविरोध कराव्यात. सध्या सुटा संघटना निवडणुकीच्या तयारीत आहे. मात्र प्राध्यापकांनी निवडणुकीच्या धकाधकीत पडता गुणवत्ताधारक वरिष्ठ प्राध्यापकांना चर्चेने या पदावर पाठवावे. अन्यथा गेल्या निवडणुकीला प्राध्यापक विकास आघाडी केल्याप्रमाणे याहीवेळेस मागासवर्गीय प्राध्यापक संघटना, वालचंद शिक्षण समूह, इतर महाविद्यालयातील समविचारी संघटना, प्राध्यापकांना घेऊन आघाडी तयार करून सर्व जागा लढवेल, असा इशारा प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...