आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक लांबतुरे अ‌विरोध आज होणार चित्र स्पष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीतून सोमवारपर्यंत जणांनी माघार घेतली. अनुसूचित जाती आणि जमाती मतदारसंघासाठी तीन अर्ज आले होते. राजेश म्हेत्रे आणि दुंडप्पा टक्कळकी यांनी माघार घेतल्याने अशोक लांबतुरे यांची अविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
बँकेच्या १५ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. एकूण ९६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननीत मात्र ६१ अर्ज निकाली काढण्यात आले. बँकेच्या पोटनियमातील दुरुस्तीनुसार १० हजार रुपयांचे शेअर्स आणि ५० हजार रुपयांची ठेव असणारेच निवडणुकीस पात्र असे निकष लावले. त्यानुसार आलेल्या हरकतींमुळे मोठ्या संख्येने अर्ज छाननीतच बाद झाले. एकूण ३५ अर्जच वैध ठरले. त्यातून सोमवारपर्यंत जणांनी माघार घेतली. आता २७ अर्ज राहिले आहेत. मंगळवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

यांनी घेतली माघार
प्रकाश वाले (भटक्या जाती जमाती मतदारसंघ), शिवलीला वाले (महिला प्रतिनिधी), पशुपती माशाळ, भीमाशंकर म्हेत्रे, शांतप्पा कुंभार, सिद्धय्या हिरेमठ (इतर मागासवर्ग प्रतिनिधी), राजेश म्हेत्रे, दुंडप्पा टक्कळकी (अनुसूचित जाती मतदारसंघ).