आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीमध्ये मकरंदराजे, शिंदे, दंडनाईकसह नऊजण इच्छुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या उस्मानाबाद शहरात पुढचे काही दिवस राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्याची सुरुवात लवकरच होईल. नगराध्यक्षांची थेट नागरिकांतून निवड आणि त्यात सर्वसाधारण प्रवर्गाला जागा सुटल्याने नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा वाढणार आहे.नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन पक्षाने केल्यानंतर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, संजय पाटील आदी नऊ जणांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र, पक्षाकडून निष्ठावान आणि विश्वासू कार्यकर्त्यालाच संधी मिळेल, अशी पक्षामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
उस्मानाबादेत पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकण्यासाठी यापूर्वी काँग्रेस, शिवसेना, भाजप, अशी सर्वपक्षीय आघाडी झाली. मात्र, त्यात अपेक्षित यश आले नाही. यावेळी पुन्हा सर्वपक्षीय नेते विरोधात मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीतील काही अस्वस्थ चेहऱ्यांना बाहेर ओढण्याचीही तयारी आहे. मात्र, पक्षाने नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागवून घेतले आहेत. इच्छुकांची नावे समोर यावीत, त्यांचा विचार योग्य राहील का, अशी चाचपणी पक्षांतर्गत करण्यात आली. त्यासाठी १० ऑक्टोबर अर्ज करण्याची अखेरची तारीख देण्यात आली होती.त्यानुसार पक्षाकडे एकूण जणांचे अर्ज आले असून, त्यात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, विद्यमान नगराध्यक्ष संपतराव डोके, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमरसिंह देशमुख, नगरसेवक रोहित निंबाळकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, यांचा समावेश आहे. पालिकेत गेल्या काही दिवसांत सत्ताधाऱ्यांमध्येच द्वंद्व निर्माण झाले होते. सत्ताधारी गट एकमेकांवर तुटून पडत होते. अशावेळी राजकीय गोटात खळबळ उडाली शिवाय वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला. हा अनुभव लक्षात घेऊन पक्षाकडून नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांपैकी कोणाची अपेक्षा पूर्ण होणार, कोण अन्य पक्षात उड्या मारणार, कोण बंडखोरी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेसची उशिरापर्यंत खलबते :पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांची जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीला आमदार बसवराज पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पालिका निवडणुकीत आघाडी करायची किंवा नाही, यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

भाजपमध्ये जणांची मागणी
प्रथमच स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पक्षामध्येही नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड.मिलींद पाटील, अॅड.खंडेराव चौरे आदींसह जण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. केंद्र आणि राज्य शासनाच्या कामांचा प्रभाव पाहता पालिका निवडणुकीत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सेनेकडून खोचरे, साळंुके चर्चेत
शिवसेनेनेही पालिका निवडणुकीत स्वबळ अजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू झाली आहे.उस्मानाबादेत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळंुके, प्रवीण कोकाटे, यांची नावे चर्चेत आहेत. मात्र पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते,याकडे संपूर्ण लक्ष आहे.
निष्ठावंतांना संधी मिळणार?
सहा महिन्यापूर्वी पालिकेच्या इतिहासात मोठा राजकीय भूकंप टळला होता. नगराध्यक्षपदावरून राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. म्हणजेच नगराध्यक्षपदासाठी शहरात चुरस आहे, हे लक्षात घेऊन पक्षाला नियोजन करावे लागणार आहे.मात्र, पक्षाकडून विश्वासू तसेच निष्ठावान उमेदवारालाच उमेदवारी दिली जाण्याची चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...