आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस, भाजपची पालिका निवडणुकीची तयारी सुरू, राजकीय पक्षांत आरोप - प्रत्यारोप सुरू झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणूक सात महिन्यांवर आली आहेत. पुढील दोन महिन्यात प्रभाग रचना सुरुवात होऊन आरक्षण पडणार आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण निर्मिती करण्यात येत आहेत. काँग्रेसकडून बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे तीन दिवस शहरात तळ ठोकून कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शासकीय पातळीवर बैठका घेऊन काम सुरू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत अाहेत. भाजपकडून कामगार मेळावा, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचे दिसते.
राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. मागील महापालिका निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर त्यांच्यात मनोमिलनही झाले. त्यानुसार यंदाच्या मनपा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप होईल.

राजकीय आरोपाचे बीज महापौरांच्या प्रभागातून सुरू झाले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटी आमच्यामुळे झाली. महापालिका बजेट एकमताने झाले. त्यामुळे विरोधकांना आमची कामे पसंत आहेत, असे आरोप सुरू झाले. काँग्रेसचे नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया आणि भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. भाजप शहर पदाधिकारी मेळावा घेऊन मनपा निवडणुकीसाठी तयार राहा असे म्हणत पालकमंत्री देशमुख यांनी कार्यकर्त्यांना काम करण्याचा कानमंत्र दिला. सोलापूरचे प्रभारी उमा खापरे यांनी सोलापूरचा दौरा करून कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. महिला कामगार मेळावा भाजपकडून घेण्यात आला.

दानवे सोलापुरात येणार
येत्या११ जुलै रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे येणार आहेत. मनपा निवडणुकीत काँग्रेसचा भर सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांच्यावर राहणार आहे. त्यानुसार शिंदे यांनी अंतर्गत हालचाली सुरू करून उमेदवारांची चाचपणी सुरू केली.
बातम्या आणखी आहेत...