आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजकीय धमाके; उशिरापर्यंत मंथन सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते मकरंद राजेनिंबाळकर यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२८) स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले आणि उस्मानाबाद शहरातील राजकीय समीकरणांमध्ये झपाट्याने परिवर्तन जाणवले. बार्शीमध्ये शिवसेना उपनेते प्रा.तानाजी सावंत यांच्या महाविद्यालयात शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत सेना-भाजपच्या जागावाटपाचा विषय सुरू होता तर उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतही खल संपत नव्हता. काँग्रेसकडून मधुकर तावडे, राष्ट्रवादीकडून अमित शिंदे, सतीश दंडनाईक अमोल पाटोदेकर तर शिवसेना-भाजप युतीकडून सुधीर पाटील, प्रेमाताई पाटील, सूरज साळंुके यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत एकाही प्रमुख पक्षाकडून उमेदवार निश्चित झाले नव्हते.दरम्यान, सर्वच भागातील पक्षाचे अधिकृत उमेदवार काेण, हे शनिवारी एबी फॉर्म मिळाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
उस्मानाबाद पालिकेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गाला सुटल्याने रस्सीखेच वाढली आहे. ऐनवेळी शिवसेना-भाजपची जुळलेली युती, स्पर्धेतून बाहेर पडलेले मकरंदराजे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा, शिवसेनेचे अनिल खोचरे यांनी अचानक निवडणूक लढवण्याचा घेतलेला पवित्रा, या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवगळता सगळ्या प्रमुख पक्षामध्ये समीकरणे बदलून गेली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या घडामोडी घडत असल्याने तसेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस शिल्लक असल्याने उशिरापर्यंत सगळ्याच पक्षामध्ये मंथन सुरू होते. शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये जिल्ह्याच्या विषयासाठी बार्शीमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. काँग्रेसमधील सर्व इच्छुकांची उस्मानाबादेत रात्री उशिरा बैठक सुरू झाली. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारचा दिवाळीचा पहिला दिवस राजकीय नेत्यांसाठी अत्यंत धावपळीचा असेल. शनिवारी दुपारपर्यंत खऱ्या अर्थाने कोण-कोणाच्या साेबत आहे, हे स्पष्ट होईल.

उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वेाच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर उस्मानाबादमध्ये राजकीय समीकरणे बदलली असून, मकरंदराजेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार का, याबाबत शुक्रवारी दिवसभर प्रश्नार्थक चर्चा सुरू होती. मकरंदराजे शिवसेनेत प्रवेश करणार अशाही चर्चा सुरू होत्या. मात्र,या अफवा असल्याचे खुद्द मकरंदराजेंनीच जाहीर केले. त्यामुळे उत्सुकता वाढली असून, नेमके काय होणार, हे शनिवारी दुपारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट होईल.
राजकीय दिवाळी
राजकीय नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांची दिवाळी अत्यंत धांदलीमध्ये सुरू आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस शनिवारचा असल्याने तसेच उमेदवारांची नावे एकाही पक्षाने निश्चित केल्याने इच्छुक पदाधिकाऱ्यंासह कार्यकर्त्यांची, उमेदवारांची घालमेल सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात निवडणुकीची प्रक्रिया आल्याने नेत्यांना, कार्यकर्त्यांना बैठका, मुलाखती,चर्चेसाठी वेळ द्यावा लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...