आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी सपाट; राष्ट्रवादी बहुमतात, उस्मानाबादेत कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- कळंब,तुळजापूर आणि भूममध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस-सेना-भाजप आघाडीला पराभवाची धूळ चारली. उस्मानाबाद बाजार समितीमध्ये १८ पैकी १५ जागा राष्ट्रवादीने मिळविल्या असून, अवघ्या तीन जागा आघाडीच्या पदरात पडल्या आहेत. चारही कृषी उत्पन्न बाजार समितीवर पक्षाचा झेंडा फडकावत राष्ट्रवादीने मिळविलेल्या यशाचे परिणाम महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीवर जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २) मतदान घेण्यात आले. मंगळवारी (दि. ३) येथील तहसील कार्यालयालगतच्या महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. सकाळी वाजेपासून तीन फेऱ्यांमध्ये सहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेदरम्यान पहिली फेरी संपल्यावर व्यापारी हमाल मापाडी मतदारसंघाचे निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये व्यापारी मतदारसंघातून श्रीराम घोडके सतीश सोमाणी यांना तर हमाल मापाडी मतदारसंघातील अविनाश चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. या तीनही जागा सर्वपक्षीय पॅनेलच्या पदरात पडल्या. यामुळे या पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. यानंतर ग्रामपंचायत साेसायटी मतदारसंघाचे निकाल जाहीर करण्यात आले. या दोन्हीतील सर्व १५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून निहाल काझी, तानाजी गायकवाड, बाळासाहेब घुटे, श्याम जाधव, दत्तात्रय देशमुख, उद्धव पाटील, व्यंकट पाटील, महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी नाईकवाडी, रत्नमाला सिनगारे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून युवराज शिंदे, इतर मागास प्रवर्गातून जीवन हिप्परकर, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून बबिता अरुण माने, अरुण वीर, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून दयानंद भोयटे, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून रामलिंग जटाळे निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. ए. शिंदे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. आर. सय्यद यांनी काम पाहिले. यांच्यासह मतमोजणीसाठी २५ कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत सोसायटी निवडणुकीत विशेष लक्ष नसते. गावातील कार्यकर्ते एकाकीपणे लढा देतात. उलट राष्ट्रवादीचे या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष असते. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी विजय सोपा होतो. हीच बाब बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयासाठी नेहमीप्रमाणे कारणीभूत ठरली. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर १५ जागा पदरात पाडून राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. सर्व निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलसमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक राष्ट्रवादीभवन येथे नेण्यात आली.

सोसायटी,ग्रामपंचायत ठरली बलस्थाने : तालुक्यातीलविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघामध्ये या संस्थांच्या सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी सकारात्मक ठरली. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या सोसायटी ग्रामपंचायतींमध्येही राष्ट्रवादी सुरुंग लावण्यात यशस्वी झाला आहे.

व्यापारीमतदारसंघात चुरस : व्यापारीमतदारसंघात चांगलीच चुरस झाली. यामध्ये विजयी उमेदवार विशेष फरकांनी विजयी झाले नाहीत. विजयी उमेदवार सोमणी केवळ १५ मतांनी विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर पवार यांना ३६९ मते आहेत. तर दुसरे विजयी उमेदवार श्रीराम घोडके यांना सोमाणी यांच्यापेक्षा केवळ १३ मते अधिक आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या संतोष हावडे यांना ३६६ मते आहेत.

- सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ
निहाल काझी (६८३), तानाजी गायकवाड (६९५), बाळासाहेब घुटे (६८६), श्याम जाधव (७०४), दत्तात्रय देशमुख (६९३), उद्धव पाटील (६५९), व्यंकट पाटील (६६३). महिला राखीव : रोहिणी नाईकवाडी (६९७), रत्नमाला सिनगारे (६९८). सोसायटी विजा/भज : युवराज शिंदे (७०६).
सोसायटी इमाप्र :
जीवन हिप्परकर (७०६)
-ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ
बबिता माने (६३६), अरुण वीर (६०४). आिर्थकदृष्ट्या दुर्बल घटक : दयानंद भोयटे (६५०). अनुसूचित जाती जमाती : गोपाळ आदटराव (६४०).
- हमाल/मापाडी मतदारसंघ
अविनाश चव्हाण (१२०)

- व्यापारी मतदारसंघ
श्रीराम घोडके (३९७), सतीश सोमाणी (३८४)
मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार त्यांना मिळालेली मते
यामुळे झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

काँग्रेसचे नुकसान
गतवेळीझालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. यामध्ये चार जागा काँग्रेसला मिळू शकल्या होत्या. यावेळी मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीशी फारकत घेतली. सुरुवातीला या दोन्ही पक्षात आघाडी होण्याचे वातावरण होते. नंतर मात्र, आघाडी होऊ शकली नाही. यामुळे काँग्रेसला नुकसान सहन करावे लागले.

चार समित्यांमध्ये वर्चस्व
चारमहिन्यांपूर्वी कळंब बाजार समितीची निवडणूक झाली. येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने बहुमत मिळवले होते. नंतर तुळजापूर, भूम येथेही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. आता उस्मानाबाद बाजार समितीमध्येही आमदार पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचेही सिद्ध झाले अाहे. विरोधकांच्या एकत्रित शक्तीचा काहीही परिणाम होऊ शकला नाही.

विरोधकांचे प्रतिनिधी बाहेर
मतमोजणीदरम्यान काही वेळातच हमाल मापाडी व्यापारी मतदारसंघ वगळता अन्य राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. आघाडी तोडून विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळणे अशक्य वाटत होते. पराभव समोर दिसत असतानाच सर्वपक्षीय पॅनेलच्या उमेदवार मतदान प्रतिनिधींनी मतमोजणी स्थळ सोडले. व्हॉट्सअॅप, फोनवरून राष्ट्रवादीचा विजय दृष्टीक्षेपात येताच या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

दुपटीपेक्षा मोठा फरक
हमाल मापाडी मतदारसंघ, सोसायटी ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वच विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांपेक्षा दुपटीपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली. हमाल मापाडी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नारायण येलकर यांना केवळ ३५ मते मिळाली तर चव्हाण यांना १२० मते मिळाली. तसेच सोसायटी ग्रामपंचायत मतदारसंघात पराभूत विजयी उमेदवारांमध्ये सुमारे ४०० ते ४५० मतांचा फरक आहे.
-ग्रामपंचायत, सोसायटी संस्था अधिक ताब्यात असल्यामुळे फायदा.
-ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना सर्व मदत.
-ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार ठरवण्यापासून लक्ष.
-ताब्यात आलेल्या दोन्ही संस्थांमध्ये विचारपूर्वक पदाधिकाऱ्यांची निवड.
-सभा, मेळाव्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालकांसोबत संपर्क.
-अशा निवडणुकांमधील विजयासाठी गावागावांत व्यूहरचना.
बातम्या आणखी आहेत...