आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत अभियंता पाच हजाराची लाच घेताना जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेतीपंपासाठीपाच वर्षांपूर्वी महावितरणकडे कोटेशन दाखल केले होते. शेतात विजेसाठी तीन पोलची गरज होती. यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तडवळ शाखा कार्यालयातील विद्युत शाखा अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराने २०१० मध्ये अक्कलकोट महावितरणच्या कार्यालयात वीज कनेक्शनसाठी कोटेशनसह अर्ज केला होता. कोटेशननुसार पोल उभा करून तारा ओेढण्याची जबाबदारी तडवळ शाखेचे अभियंता रामचंद्र महादेवप्पा पाटील यांच्याकडे होते.

वेळोवेळी भेट घेऊन विनंती केली. त्यांनी या कामासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दाखल केली. त्यानुसार सापळा लावला असता पाच हजारांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता पाटील तसेच खासगी इसम चाँदसाब पठाण यांना रंगेहाथ पकडण्यात अाले. अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे कामकाज सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...