आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत सहायकाचा मृत्यू; वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारातील डोंजा फिडरवरील फाॅल्ट काढण्यासाठी परमीट घेता पाठवलेल्या विद्युत सहाय्यकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मण गिरी यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (दि.३) अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांनी केली.

वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मण गिरी विद्युत सहाय्यक गणेश अलाट हे दोघे उपविभाग परंडा अंतर्गत ११ के. व्ही. डोंजा फिडरवर ग्राहकांच्या तक्रारीनुसार काम करण्यासाठी गेले होते. लक्ष्मण गिरी ३३/११ के. व्ही. परंडा उपकेंद्रात गेले गणेश अलाट यांना वीज वाहिनीचा फॉल्ट काढण्यासाठी पाठवले. त्यावेळी वीज वाहिनीवरील काम करण्यापूर्वी कंपनी नियमाप्रमाणे लाइनवर परमीट घेण्याची गरज होती. मात्र, परमीट घेता हॅन्ड ट्रीप घेतली असे सांगितले. त्यामुळे गणेश अलाट याचा विजेचा धक्का लगून उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कनिष्ठ तंत्रचालक अय्युब चौधरी यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे बेकायदेशीर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बातम्या आणखी आहेत...