आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना बसतोय दरमहा बिलाचा "शॉक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वीजग्राहकांना दरमहा विजेची बिलं येतात. अनेकांच्या बिलांमध्ये तफावत असते. याची दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्यांना हेेलपाटे मारावे लागतात. यामुळे त्यांच्या रोजच्या कामावर-रोजगारावर परिणाम होतो. बिल तर दुरुस्त होत नाही शिवाय ‘अगोदर बिल भरा नंतर दुरुस्ती करू’, अशी भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांची असते. यामुळे जास्त आलेले बिल आहे तसेच भरले जात आहे. कारण ‘महावितरण’कडून वीजजोड तोडले जाण्याची शक्यता असते.
सोलापूर शहरात एकूण लाख ८५ हजार वीजग्राहक आहेत. यामध्ये घरगुतीपासून व्यावसायिक अशा सर्वच प्रकारचे ग्राहक आहेत. शहरात पाच सब डिव्हीजन ऑफिस आहेत. या कार्यालयामार्फत शहरात वीजपुरवठा केला जाताे. वीजग्राहकांच्या काही अडचणी असल्यास ते त्यांच्या परिसरातील कार्यालयात गाऱ्हाणे मांडतात. यात बऱ्याचेवळा वाढीव वीज बिलाची तक्रार आणि मीटरची तक्रार असते. अशावेळी त्या वीजग्राहकांकडून अर्ज लिहून घेतला जातो. अर्ज दिल्यानंतर कमीत कमी दहावेळा हेलपाटे मारावे लागतात. यानंतर कधी दुरुस्ती होते तर कधी आहे तसे बिल भरावे लागते. खरे पाहता बिलांची दुरुस्ती ही दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे.

२५टक्के लोक तारखेच्या नंतर भरतात वीज बिल
काही ठिकाणी एक दिवस अगोदर बिले दिली जातात त्यामुळे वीज बिल भरण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यांना दहा रुपये दंड भरावा लागतो. शहरात सुमारे लाख ८५ हजार वीजग्राहक आहेत. यातील वीस ते पंचवीस टक्के म्हणजे म्हणजे ३७ हजार ते ४६ हजारपर्यंत ग्राहक तारखेच्या नंतर वीजबिल भरतात. म्हणजे वीजग्राहकांना लाख ६० हजार रुपये भुर्दंड बसतो.

सहा महिन्यांपासून हेलपाटे
^गेल्यासहा महिन्यांपासून बिल दुरुस्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मीसुध्दा कायदेशीर लढा देणार आहे. एका महिन्यात दुरुस्त झालेले बिल दुसऱ्या महिन्यात पुन्हा येते. म्हणजे हा पोरखेळ नाही का?” प्रमोदझाकणे, वीजग्राहक

दोन दिवसांत दुरुस्ती हवी
^बिलाचीदुरुस्ती करण्यासाठी महिना लागतो. तोपर्यंत दुस ऱ्या महिन्याचा बिल येतो. दोन्ही महिन्याचा बिल आणि त्यासोबत दंड असतो. त्यामुळे महावितरणाने अवघ्या दोन दिवसांत बिल दुरुस्त करून द्यावे.” विवेकदासरे, सामाजिककार्यकर्ते

अनुभवायला येतात असे अजब प्रकार
विजापूरनाका झोपडपट्टी क्रमांक मध्ये राहणारे प्रमोद झाकणे यांच्या बिलामध्ये खूप मोठी तफावत आहे. ९८ युनिट वीज खर्च झाले असताना ३०० युनिटचा वापर दाखविण्यात आला. याबाबत त्यांनी तक्रार केली असता प्रथम दखल घेण्यात आली नाही. दहा ते पंधरावेळा हेलपाटे मारल्यानंतर बिलामधील ४५० रुपये कमी करण्यात आले. मात्र रिडिंग सुधारण्यात आले नाही. त्यांनी बिल भरले. कमी केलेले ४५० रुपये पुन्हा पुढील महिन्याच्या बिलामध्ये लागून आले. याबाबत विचारणा केली असता ते भरावेच लागतात असे उत्तर मिळाले. गेल्या सहा महिन्यांपासून ही चालढकल सुरू आहे.

वीजबिलाची समस्या घेऊन गेल्यानंतर मीटर तपासण्याचा सल्ला दिला जाताे. मग दीडशे रुपये भरल्यानंतर जुन्याच्या शेजारी नवीन मीटर बसविला जातो. आठवडाभर दोन्ही मीटरच्या रिडिंगची तपासणी केली जाते. दोन्ही रिडिंगमध्ये तफावत दिसली तर मीटर बदलून दिले जाते. अन्यथा आहे ते मीटर योग्य असल्याचे सांगत वीज बिल भरण्याची सक्ती केली जाते. मीटरमध्ये दोष आहे किंवा नाही ते मीटर तपासल्यानंतर समोर येते. मीटरमध्ये असलेले दोष तपासण्यासाठी दीडशे रुपये वीजग्राहकांचे जातात.

काही ठिकाणी ठरलेल्या तारखेनुसार मीटर रिडिंग घेण्यासाठी येत नाहीत. ७०-८० युनिट वीज बिल येत असेल त्याठिकाणी १०० युनिट येते. यामुळे शंभर किंवा शंभरपेक्षा जास्त युनिट खर्च झाले तर त्याच्या विजेचा प्रती युनिट दरही वाढतो. यात चूक महावितरणची शिक्षा वीजग्राहकांना मिळत आहे. तसेच कॅमेऱ्याद्वारे मीटरचा फोटो काढून रिडिंग घेतले जाते. रिडिंग घेणाऱ्यांची गडबड इतकी असते की हे लोक रिडिंग चुकीच्या पध्दतीने घेऊन जातात. यामुळे बिल चुकीचे येते. बिलावर चार ते पाच दिवसांची छापील मुदत रक्कम भरण्यासाठी असते. मात्र, बिलच त्या मुदतीच्या एक दिवस आधी दिले जाते. त्यामुळे बिल भरण्यास विलंब होतो. बिल भरण्यास विलंब झाला की दहा रुपये दंड आकारला जातो. यात वीज ग्राहकांचा वेळ, पैसा, रोजगाराचे नुकसान होत आहे.

कामात सुधारणा होईल
^वीज ग्राहकांनावेळेवर रिडिंग घेणे, वेळेवर बिल देणे, बिलात चुका होऊ नये, चुका झाल्यास लवकरात लवकर दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. समाधानात्मक सेवा पुरविणे आमचे काम आहे. तक्रारी पुढे येणार नाहीत. यामध्ये सुधारणा होईल.” एस.बी. साळे, अधीक्षकअभियंता, महावितरण

विद्युतपुरवठा तक्रारी- २५ निवारण- २५
बिलाच्यातक्रारी- ३४ निवारण- ३२
मीटरच्यातक्रारी- १९ निवारण- १६
विद्युतपुरवठा तक्रारी- ९, निवारण-
बिलाच्यातक्रारी- ३, निवारण-
मीटरच्यातक्रारी- २, निवारण-

गायत्री नगर येथील वीज ग्राहकांवर अन्याय
पूनानाका, गायत्री नगर येथील २५ ते ३० ग्राहकांना दिवाळी काळात तिप्पट वीज बिल आले होते. त्यावेळी या लोकांनी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवले. कोणालाही दया आली नाही. शेवटी काहीनी वीज बिल भरले तर काहीनी लढा दिला. यापैकी संजय कुलकर्णी हे एक असे ग्राहक आहेत की ज्यांनी तब्बल १२ वेळा फिरून आपले वीजबिल कमी करून घेतले. त्यांना दरमहा ३५० ते ४०० रुपये बिल येते. त्यावेळी ११५० रुपये बिल आले. तक्रार केल्यानंतर फक्त २९६ रुपये कमी करून देण्यात आले. २९६ कमी करून घेण्यासाठी त्यांना १२ दिवस पेट्रोल खर्च झाला, रोजगार बुडाला, वेळ वाया गेला.

बारा चकरा मारल्यानंतर दुरुस्ती
^रोजच्या कामातून विजेचे बिल दुरुस्त करून घेण्यासाठी तब्बल १२ चकरा मारल्या. तेव्हा कुठे तरी बिल दुरुस्त झाले. तेही अपेक्षेप्रमाणे झाले नाही. बिल दुरुस्त करण्यासाठी चकरा मारल्या त्यावेळी माझा पेट्रोल, वेळ आणि राेजगार बुडाला त्याला जबाबदार कोण?” संजयकुलकर्णी, वीजग्राहक