आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक हत्तुरेंनी वीजचोरी रोखताना केला हस्तक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हापालिकेच्या दिवाबत्ती खांबावर विनापरवाना चार फोकस लावले आहेत. सिद्धेश्वर पेठेतील पादत्राण्याच्या दुकानावर प्रकाश झोत असलेले फोकस काढण्यासाठी बुधवारी महापालिकेचे अधिकारी तेथे पोहोचले. परंतु, तेथील काही नागरकि आणि नगरसेवक रफीक हत्तुरे यांनी हस्तक्षेप केला. नाईलाज झाल्याने अधका-यांना हात हलवत परतावे लागले.

त्या खांबांवर पालिकेचे सार्वजनकि दिवे आहेत, तरी वीज चोरी सुरू आहे. महापालिकेस वारंवार सांगूनही फोकस लावले जात नसल्याने वर्गणी गोळा करून फोकस लावल्याचे सांगत नगरसेवक हत्तुरे यांनी मनपा अधिका-यांना दिवे हटवण्यास मज्जाव केला. अब्दुल कलाम चौक ते भूविकास बँक चौक दरम्यानच्या रस्त्यावर हवा ट्रेडर्स या पादत्राण्याच्या दुकानावर प्रकाश पडेल अशा पद्धतीने हे फोकस लावले आहेत. महापालिकेची परवानगी घेतलेली नाही.

एक फोकस ४०० व्हॅटचा असून, दहा तास सुरू ठेवल्यास चार युनिट वीज वापर होतो. चार फोकससाठी रोज २८ युनिट वीज लागते. महापालिकेच्या खांबाला हूक लावून हा वीज चोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यमान नगरसेवकाने वीज चोरी होत असताना पाठीशी घालून अधिका-यांच्या कामात हस्तक्षेप करणे त्याहून गंभीर आहे. मनपा विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी इतरांना कारवाईविना परत परतावे लागले. नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी याप्रकरणी माहिती घेतो असे उत्तर दिले.

हवा ट्रेडर्स या दुकानासमोर विद्युत खांबांवरून वीजचोरी सुरू आहे. मनपा अधिका-यांनी फोकस जप्त केले तेव्हा नगरसेवक हत्तुरे यांनी हस्तक्षेप करत पुन्हा फोकस लावण्यास भाग पाडले.
बातम्या आणखी आहेत...