सोलापूर- दीड लाख रुपयांत कोणताही शेतकरी स्वत:च्या मौल्यवान फळ किंवा भाजीपाल्यासाठी कोल्डस्टोअरेज युनिट उभा करू शकेल किंवा दीड लाख रुपयांत कोणतीही शाळा स्मार्ट क्लासरूम उभी करू शकेल.
हरिभाई देवकरण मैदानावर इलेक्ट्रो हे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सची विविध नावीन्यपूर्ण उत्पादनांनी बहरलेली विविध दालने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत अाहेत. संपूर्ण मॅटिंग, डस्ट फ्री प्रदर्शन, हिरवेगार उद्यान, वस्तूंची माहिती देण्यासाठी खास दालने, विविधांगी वस्तूंची रेलचेल यामुळे हजारो सोलापूरकरांनी प्रत्यक्ष भेट देत प्रदर्शनात हजेरी लावली.
1 लाख 80 हजारांत कोल्डस्टोअरेज युनिट
सोलापुरात तसेच इलेक्ट्रोमध्ये प्रथमच लक्ष्मी एंटरप्रायजेसने शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी ठरणाऱ्या कोल्डस्टोअरेजचे युनिट प्रदर्शनात मांडले. अनेकजण उत्सुकतेने याची चौकशी करीत आहेत. ते १० डिग्री इतके तापमान या कोल्डस्टोअरेजमध्ये असेल. केळी, विविध फळे, भाजीपाला यात महिनोन््महिने ताजा राखला जाईल. सहा बाय सहा बाय सहा फूट इतक्या क्षमतेच्या या कोल्डस्टोअरेजमध्ये पाच टन माल राहू शकेल. १० बाय १० बाय या क्षेत्रफळाचे युनिट अडीच लाखाला आहे, अशी माहिती संचालक प्रवीण मठपती यांनी दिली.
मानवी हालचाल झाली की अलार्म वाजेल...
वाईज ऑटोमेशनने विविध सेन्सर्स लॉन्च केली आहेत. घरातील लायटिंग म्हणजे फॅन, ट्यूब अगदी सोफ्यावर बसल्या जागी रिमोट कंट्रोलने बंद-चालू करू शकता. युनिट किंमत चार हजार रुपये. मानवी हालचाल झाली तर अलार्म वाजेल, ट्यूब चालू, बंद होऊ शकेल असे मोशन सेंसर्स केवळ ७०० रुपयांना. वाईज लाईट सेन्सरही उपलब्ध आहेत.
दीड लाखात स्मार्ट क्लास
डिजिटल क्लासरुमची संकल्पना प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. जे. एम. डिस्ट्रीब्युटर्सने इन्फ्रारेड इंट्रॅक्टीव्ह स्मार्ट व्हाईट बोर्ड आणले आहे. चक्क बोटाने लिहू शकतो. इंटरनेट जोडू शकतो. केवळ टच करणे. एमएस ऑफिस, मॅक, लिनेक्स फळ्यावर वापरू शकतो. दुसऱ्या हार्ड ड्राईव्हची गरज नाही. प्रोजेक्टरसह युनिट दीड लाख रुपयांना आहे.