आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट औरंगजेबाने बेगमांसाठी रमजानमध्ये भरवला बेगम बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुघलसम्राट औरंगजेबाच्या १६८५ पासूनच्या सोलापुरी वास्तव्य काळात त्यांनी आपल्या बेगमांसाठी विजापूर वेस ते वडवान चौक आणि पेंटर चौक ते विजापूर वेस अशी एक पेठ वसवली. याचा मुख्य उद्देश हाच होता की, त्यांच्या बेगमांना विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात किंवा उपलब्धता व्हाव्यात. आज रमजाननिमित्त भरत असलेल्या स्त्रियांसाठीच्या येथील बाजाराला बेगम बाजार असे संबोधतात.

बेगम पेठ त्याकाळात सम्राट औरंगजेबाच्या वास्तव्याचा मोठा तळ होता. मुख्य डेरा त्याकाळी डाक बंगल्याच्या उंचवट्यावर होता. त्याच्या बाजूला सैन्याचा मुक्काम होता. सरदार सुभेदारांच्या जनानखान्यासाठी (स्त्रियांची राहण्याची व्यवस्था) काही स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक होते. विशेषत: या भागातील बुरखाधारी महिलांना आपल्या वस्तू खरेदी करण्यास, दिल्लीत जसा स्वतंत्र बाजार करण्यात आला होता, तसा बाजार त्या बाजारातील व्यवहार करणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी एक पेठ वसवण्यात आली. या परिसरात गाणे नृत्याव्दारे मनोरंजन करणाऱ्या स्त्रियांची व्यवस्था करण्यात आली होती. आजही रमजान मुस्लिम उत्सवात येथे महिलांसाठी विशेष बाजार असतो.
बेगमनावाचे असेही पुरावे
केवळएक पेठ वसवून औरंगजेब थांबले नाही तर त्यांनी या भागात एका मशिदीला बेगमबी मशीद असे नाव दिले आहे. तसेच या परिसरात ब्रिटिश काळात पोलिस चौकी उभारण्यात आली. जुन्या जमान्यात येथे राजांच्या दासी राहात. त्यांच्यात कायम कटकटी तक्रारी होत. त्यावेळी या चौकीचे नाव दुसरे होते परंतु सध्या यास बेगम पेठ पोलिस चौकी असे संबोधले जाते. तर औरंगजेबाचा नातवाचा विवाह सोहळा याच काळात समाचार चौकातील एका मशिदीत पार पडला, तर त्याची पत्नी मूळची राहणारी सोलापूरची असल्याने तिला सोलापुरी बेगम असे म्हणत.
पाच्छा पेठ वसवली
औरंगजेबने सोलापुरात असताना अनेक पेठा वसवल्या. त्याच्या राण्या, दासी नर्तिका यांच्यासाठी वसवली ती बेगम पेठ. तसेच आज असलेली पाच्छा पेठ त्याकाळी पादशहा पेठ संबोधत. कारण, तेथे त्याचे सरदार राहात. फातुहाते आलमगिरी या फारशी ग्रंथात तसेच इतर ग्रंथांत याचा उल्लेख आहे. सेतू माधवराव पगडी यांनी भाषांतर केले.” डॉ.सत्यव्रत नूलकर, इतिहास तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...