आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता वन कर्मचाऱ्यांनीच बनावे सर्पमित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनकायद्यात समाविष्ट असलेले साप पकडण्याचे तांत्रिक कौशल्य वन कर्मचाऱ्यांत नाही. त्यामुळे मानवी वसाहतीत साप आढळला तर वन कर्मचारी सर्पमित्रांचा सल्ला देतात. शहर जिल्ह्यातील काही स्वयंघोषित सर्पमित्र त्याचा गैरफायदा उठवतात. भामट्या सर्पमित्रांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना साप पकडण्याचे तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
वन विभागातील नवोदित कर्मचाऱ्यांना विभाग अंतर्गत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते. राज्यात वन विभागाचे चार प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामध्ये शहापूर (जिल्हा ठाणे) येथील प्रशिक्षण केंद्रात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील वन कर्मचारी प्रशिक्षणासाठी असतात. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी कमी करून सहा महिन्यांचा करण्यात आला आहे. त्यामध्ये वनसंवर्धन अधिनियम, वनकायदे, गुन्हे नोंदवणे, आरा गिरणी वनोपज, वन्यजीव कायदा परिशिष्ट संदर्भातील प्रशासकीय माहितीचा समावेश असतो. प्रशिक्षणाच्या पारंपरिक पद्धतीत बदल, त्यामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून प्रात्यक्षिकांच्या समावेशाची गरज आहे.

वन विभागाने पूर्वीचे धोरण बदलून ‘लोकसहभागातून वनविकास’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. नागरी वसाहतीतील वन्यजीव पकडून निसर्ग सानिध्यात सोडण्याचे काम वन कर्मचाऱ्यांना करावे लागते. गेले काही वर्षे मनुष्य वसाहतीत छोटे वन्यजीव ते बिबट्या, वाघ येण्याचे प्रकार सातत्याने वाढतच आहे. घरात साप येण्याच्या घटना नेहमीच्या आहेत. वन विभाग कार्यालयात त्याबाबत नागरिकांनी फोन केला तर वनकर्मचारी सर्पमित्रांना बोलवा असा सल्ला देतात. मात्र, ग्रामीण भागात साप पकडण्यासाठी आलेले स्वयंघोषित सर्पमित्र पैसे घेतात.

भामट्या सर्पमित्रांचा उच्छाद
स्वत:चीपर्वा करता सापांना वाचवण्यासाठी अनेक सर्पमित्र अव्याहत काम करतात. पण, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्पमित्र असल्याचे सांगतात. काहीजण साप पकडल्यानंतर दुसरीकडे सोडण्यासाठी पैसे मागतात. त्यांनी साप पकडून सोडण्याचा व्यवसाय सुरू केलाय. सापांचे विष काढून त्याची तस्करीची कुजबूज सर्पमित्रांत आहे. भामट्या सर्पमित्रांवर वन विभागाचे नियंत्रण नाही. तसेच, विष तस्करीचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. या प्रकारांमुळे साप वाचवण्यासाठी निष्काम सेवा करणाऱ्या सर्पमित्रांच्या प्रतिमेला तडा जातोय.
आता वन कर्मचाऱ्यांनीच बनावे सर्पमित्र
नागपंचमी

तांत्रिक प्रशिक्षण द्यावे
वनअधिकारी कर्मचाऱ्यांना साप आेळखणे पकडण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची आमची तयारी आहे. वन कर्मचाऱ्यांनी मानवी वसाहतीत साप पकडण्याने नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल. त्यासाठी आमची संस्था मदतीला तयार आहे, असे नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे प्रमुख सर्पतज्ज्ञ भरत छेडा यांनी सांगितले.