आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४० विडी कामगार महिलांना सक्षम सहेली उपक्रमाचा आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - धूम्रपानविरोधी कायद्यामुळे विडी उद्योग संकटात आला.अर्धे आयुष्य विड्या वळण्याचे काम करणाऱ्या विडी कामगार महिलासमोर कुटुंब चालवण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा महिलांना जगण्याचे बळ देण्यासाठी निरामय आरोग्यधाम दमाणी कुटुंबांने सक्षम सहेली उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून ४० महिलांनी पारंपरिक विडी वळण्याचे काम सोडून शिवणकलेचे प्रशिक्षण घेतले. त्यातून या महिलांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. जगण्याला नवी दिशा मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य फुलले आहे.
नव्या कायद्यामुळे विडी उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. मात्र, हिम्मत हारता या महिलांनी निरामय आरोग्यधाम संस्थेच्या उपक्रमाचा लाभ घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. दमाणी कुटुंबही मदतीसाठी पुढे आले. गरजू महिलांसाठी विडी घरकुल भागात विविध प्रकारचे छोट्या उद्योगाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. ३०० महिला संस्थेच्या या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यातील ४० महिला शिवणकलेचे धडे घेत स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. या महिला आता घरबसल्या विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे काम मिळत आहे. या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

महिलांची नवे काही तरी करण्याची धडपड पाहून प्रेमरतन दमाणी ,विमल दमाणी, राजेश दमाणी, प्रिया दमाणी, रेखा थिरानी यांनी निरामय संस्थेस लाख रकमेची ठेव दिली. या रकमेतून टक्का व्याजावर केवळ ५०० रुपयांचा हप्ता भरत शिलाई मशीन घेऊन देण्यात आल्या. नवा रोजगार मिळाला. आता या महिला घरी बसल्या ठिकाणी ब्लाऊज परकर, शाळेचे गणवेश, हाफ पँट, रूमाल, टॉवेल, शर्टाचे टाय आदी कपडे शिऊन ते थेट कंपन्यांना देतात. डॉ. सीमा किणीकर, प्रा. विलास बेत, सतीश राठोड, हेमंत गोसकी, कुलदीप कुलकर्णी यांचा या उपक्रमला हातभार लागला आहे.

नवी ऊर्जा मिळाली
^विड्यावळण्याचे काम करत होते. धूम्रपानविरोधी कायद्यामुळे विडी उद्योगावर संकट आले. आता रोजगार नाही, काय करावे सूचत नव्हते. या काळात निरामयची साथ मिळाली. त्यांनी रेडिमेड कपडे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. घरबसल्या काम मिळत आहे. अमृताआडम, प्रशिक्षणार्थी

महिलांनालाभ घ्यावा
^४०विडी कामगार महिलांना आमच्या उपक्रमामुळे आधार मिळाला. दमाणी कुटंुब, टी. जे. एस. बी. बँक यांनी मदत केली आहे. विडी कामगार महिलांनी पुढे येऊन मदत घ्यावी. सीमाकिणीकर, अध्यक्ष, निरामय आरोग्य धाम

बातम्या आणखी आहेत...