आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व्हिस रस्ता जागेवरचे अतिक्रमण काढले, बांधकाम विभाग गोंधळलेलाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रस्त्यावर जीवघेण्या जड वाहतुकीवर पोलिसांचे नियंत्रण नाही. दुसरीकडे स्थानिक वाहतुकीसाठी असलेल्या सर्व्हिस रस्त्याबाबत बांधकाम विभाग मनपाच्या अधिकाऱ्यांत गांभीर्य नाही. प्रशासनाकडून टोलवाटोलवी चालू अाहे. बांधकाम खात्याने शनिवारी कसेबसे घाईघाईने चुकीच्या पद्धतीने उभारलेल्या स्पीडब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे रंगवण्यास सुरुवात केली. ते पट्टे दर्जाहिन झाले असून एका पावसातच पांढरा रंग गायब होईल, अशी स्थिती अाहे. विजापूर रस्त्यावर अपघात झाल्यानंतर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनीसर्व्हिस रस्त्याची गरजच नाही असे उत्तर दिले. दुस-या दिवशी नॅशनल हायवे अॅथोरिटीची जबाबदारी अाहे असे उत्तर दिले, नंतर उड्डानपुलाच्यावेळी हे काम होईल असे सांगितले, अाणि अाता सर्व्हीस रस्त्यावर स्थानिक वाहतुक असते, याकरीता हा रस्ता करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सांगतले. तर सर्व्हीस रस्त्याची जागा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असते म्हणून सर्व्हीस रस्ता त्यांनीच करावा, असे मत महापालिकेने व्यक्त केले अाहे. यामुळे सर्व्हीस रस्ता आता तयार करणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...