आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुल्लाबाबा : अतिक्रमण हटाव सुरू, महसूल, मनपा पोलिस यांची संयुक्त कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष्मी भाजी मंडईलगत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या गुंठे जमिनीवरचे अतिक्रमण महसूल, महापालिका आणि पोलिस विभागाने हटवले. मंदिर समितीच्या या जागेवर गेले ५० वर्षांपासून अतिक्रमण होते. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी तहसीलदार हणमंत काेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही अतिक्रमण काढून घेतल्याने मंगळवारी सकाळी महसूल, मनपा पोलिस विभागाचे संयुक्त पथकांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. काही जणांनी स्वत: अतिक्रमण काढले तर काही घरे दुकाने अतिक्रमणविरोधी पथकाने हटवली. मंगळवारी सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटवणे सुरू होते. ही मोहीम राबवताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बुधवारीही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

अतिक्रमण काढताना उपअभियंता जखमी
विजापूर वेस परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून मदत करण्यात येत होती. यासाठी मनपाचे एक जेसीबी, दोन उपअभियंता, तीन पोलिस असा ताफा होता. सायंकाळी अतिक्रमण काढताना वासा पडल्याने उपअभियंता रामचंद्र पेंटर किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार केले.
बातम्या आणखी आहेत...