आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्क चौपाटीतील अतिक्रमण काढून घेण्यास झाला प्रारंभ; आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई,

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पार्क चौपाटीवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली अन् तत्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. आदेशाचे पालन करीत अधिकारी शनिवारी तेथे पाेहोचले. मात्र तीन लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने पार्क चौपाटीवरील अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यात आले. 


पार्क चाैपाटी परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत आलेल्या तक्रारीनंतर आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली अन् लगेच अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार भूमी मालमत्ता विभागप्रमुख सारिका आकुलवार आणि अतिक्रमण विभागप्रमुख मठपती यांनी शनिवारी सायंकाळी अतिक्रमण काढण्याची तयार केली. गाडीधारकांनी नगरसेवकांकडे धाव घेतली. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सर्वांना घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी गेले. मात्र आयुक्त नसल्यामुळे सर्वजण परतले. 


यानंतर सपाटे यांच्यासह नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांनी अतिक्रमण विभाग गाठले आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतिक्रमण काढू, असे सांगितले.मात्र, अतिक्रमण काढणारच, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. यानंतर अतिक्रमण महापालिकेने काढू नये, ते स्वत:हून काढून घेतील, असे ठरले. सोमवारी आयुक्त आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, अशी भूमिका घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा सहकार्य केले. रात्री सर्व अतिक्रमण काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...