आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चअखेर रेल्वे स्थानकावर वायफाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वायफाय सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर देशातील निवडक रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा सुरू करण्याचे काम गतीने सुरू झाले आहे. मध्य रेल्वेत मुंबई, दादर, पुुणे सोलापूर स्थानकाचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत सोलापूर रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा सुरू होणार असल्याची माहिती रेलटेलचे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी दिली.
रेलटेल गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील सुमारे चारशे प्रमुख स्थानकावर वायफाय सुविधा सुुरू होणार आहे. यास निलगिरी प्रोजेक्ट असे नाव देण्यात आले. मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे या दोन झोनमधून २० रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली. यात सोलापूरचा समावेश आहे. देशातील वन दर्जाच्या स्थानकावर ही सुविधा असणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरील पाच फलाट, बुकिंग ऑफिस, वेटिंग रुम, आरक्षण कार्यालय आदी ठिकाणच्या कार्यक्षेत्रात वायफाय सुविधा कार्यरत असेल. पूर्ण फलाटावरील संपूर्ण क्षेत्रात वायफाय सुविधेचा लाभ घेता यावा म्हणून सीडी लाइन सिसको हे राऊटर बसविण्यात येणार आहे.

तीस मिनिटांसाठी मोफत सेवा
दरम्यानच्या काळात रेलटेल संपूर्ण रेल्वे स्थानकाची पाहणी करून कोणत्या ठिकाणी राऊटर बसवायचे आहे, हे निश्चित केले आहे. आणखी काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत सोलापूर रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा सुुरू होईल. पहिल्या तीस मिनिटासाठी वायफाय सुविधा प्रवाशांसाठी मोफत असणार आहे. त्यानंतर मात्र वायफायसाठी प्रवाशांना शुल्क द्यावे लागणार आहे. त्याचे शुल्क अद्याप ठरले नसल्याचे हेमंत कुलकर्णी यांनी सांगितले.