आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर जिल्ह्यात मिळून प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी ६५०० जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरजिल्ह्यात सुमारे १५ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. प्रथम वर्ष विविध विद्या शाखांच्या तब्बल ६५०० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात तब्बल ३६५ च्या वर अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यांची एकूण प्रवेश क्षमता सुमारे दीड लाख आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यातून सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. जेईईसाठी दीड हजार विद्यार्थी इच्छुक होते. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरतात. सीईटी आणि बारावी गुणांच्या आधारे अभियांत्रिकीचे प्रवेश निश्चित होतात. गुणवत्तेनुसार, आरक्षणनिहाय प्रवेश देण्यात येत असले तरी अभियांत्रिकीच्या जागा १०० टक्के भरण्यात येत नाहीत असा गत दोन वर्षांचा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपापले वेलकम स्पीच दिले आहे.
उत्तम गुणवत्ता, नॅक अॅक्रिडेशन, महाविद्यालयाची निकालाची परंपरा, नियमित प्राचार्य, विद्यापीठ मान्यताप्राप्त तज्ज्ञ प्राध्यापक, लायब्ररी, प्लेसमेंट आदी निकषांच्या आधारे अभियांत्रिकी प्रवेश विद्यार्थी निश्चित करतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील अभियांत्रिकी शिक्षण निवडण्यापेक्षा सोलापुरात दर्जेदार अभ्यासक्रम, दर्जेदार महाविद्यालये असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. विविध उपक्रमांद्वारे सोलापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपापल्या गुणवत्तेचा दाखला विद्यार्थ्यांना देत प्रवेशाच्या सुविधाही देऊ केल्या आहेत. अभियांत्रिकी शिक्षणातील ट्रेंड लक्षात घेत १०० टक्केच्या पार्श्वभूमीवर यंदा अभियांत्रिकी शिक्षणाचा कल विद्यार्थ्यांनी स्वीकारला आहे.
अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
१६ जून : ऑनलाइन अर्ज अंतिम दिवस
१९ जून : तात्पुरती गुणवत्ता यादी
१९ ते २१ जून : यादीबाबत आक्षेप
२२ जून : अंतिम गुणवत्ता यादी
बातम्या आणखी आहेत...