आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्लोमाएेवजी इंजिनिअरिंगच्या निर्णयावर शासन तोंडघशी; एअायसीटीईला’ पत्र देऊन हा निर्णय मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यातील अाठ शासकीय तंत्रनिकेतन (डिप्लोमा) महाविद्यालये बंद करून त्याएेवजी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने १३ ऑक्टोबर राेजी घेतला हाेता. मात्र ही तंत्रनिकेतन महाविद्यालये बंद करू नयेत म्हणून अांदोलने झाली तरीही निर्णय बदणार नाही, अशी ठाम भूमिका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली हाेती. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात असमर्थता दिसत असल्याने नुकतेच ‘एअायसीटीईला’ पत्र देऊन हा निर्णय मागे घेण्यात अाला. त्यामुळे अाता येत्या वर्षभरासाठी तरी या महाविद्यालयात डिप्लोमाच चालू राहणार अाहेत. 
  
राज्य शासनाचे उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी १२ एप्रिल रोजी ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ला याबाबत पत्र पाठविले आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन आहे त्याच कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयही शिफ्टमध्ये  सुरू करण्याचा विचार आहे.  नियमात असेल तर परवानगी मिळावी, असे पत्रात म्हटले आहे.  

जालना, लातूरचा समावेश...
यवतमाळ, जालना, धुळे , सोलापूर, रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतन तसेच पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन लातूर या सहा तंत्रनिकेतनचे सन २०१८ - १९ मध्ये अभियांत्रिकीमध्ये अपग्रेड करण्यास शासनाची एनओसी असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे यावर्षी तंत्रनिकेतन वर्ग सुरूच राहतील.
बातम्या आणखी आहेत...