आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रनिकेतन अन् अभियांत्रिकी एकत्रच चालवा, बंद कशाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथीलशासकीय तंत्रनिकेतन ३२ एकरांत विस्तारलेले आहे. त्याचे रूपांतर अभियांत्रिकी महाविद्यालयात करताना, पदविका अभ्यासक्रम बंद का करता? दाेन्ही एकत्र चालवा. गरीब विद्यार्थ्यांची सोय होईल, अशी मागणी मंगळवारी अल्पसंख्याक संघटनांनी केली.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करून टप्प्याटप्प्याने पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. त्याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे एक पथक आले होते. त्यांच्यासमाेर मागण्या मांडण्यात आल्या. प्रवेशद्वारासमोर ठिय्या ठोकला. या पथकात डॉ. डी. आर. नंदनवार, डॉ. एस. व्ही. जोशी, एस. व्ही. साखळकर, डॉ. एस. एस. वाळूजकर, यु. व्ही. कोकाटे यांचा समावेश होता.
उभयतांमध्ये झालेल्या चर्चेत मुस्लिम आेबीसी ऑर्गनायझेशनचे प्रदेश संघटक हसीब नदाफ, जमियत उलमा हिंदचे मौलाना हारिस, स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी, युथ काँग्रेसचे बाबा करगुळे, एनएसयूआयचे गणेश डोंगरे, एसएफआयच्या मीरा कांबळे, एमपीजेचे खलीक मन्सूर, छत्रपती शिवाजी ब्रिगेड फारुख शेख, कॉँग्रेसचे सरचिटणीस मनीष गडदे आदी होते.
शासकीय तंत्रनिकेतनसमोर मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

अल्पसंख्याकांच्या विरोधातील निर्णय
^तंत्रनिकेतनबंदकरण्याचा निर्णय अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजात अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. या निर्णयाने अल्पसंख्यांकांचे भविष्य धोक्यात येईल. तो निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.'' हसीबनदाफ, प्रदेश सरचिटणीस, मौलाना आझाद विचार मंच
बातम्या आणखी आहेत...