आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर रस्त्यावर हायमास्टचा अडथळा, आयटीआय पोलिस चौकीसमोर खोदाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रस्त्यावर हायमास्ट (उंचखांबी) दिव्यांचा अडथळा होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था पोलिस चौकीसमोरील रस्त्यावर मध्यभागीच दिवा बसवण्यासाठी खोदाई सुरू आहे. वाहनांना वळण्यासाठी ही जागा होती. मोकळ्या जागेऐवजी दुभाजकाच्या कडेला दिवा बसवल्यास ही अडचण येणार नाही.
शहरात हायमास्ट बसवण्याची चढाओढ नगरसेवकांमध्ये सुरू आहे. प्रमाणपेक्षा जास्त ५९ हायमास्ट शहरात सुरू आहेत. १२.५ आणि मीटर असे मोठे मिनी हायमास्ट दिवा बसवण्यात येत आहेत. एकाच चौकात दोनपेक्षा जास्त हायमास्ट दिवे असल्याचे दिसून येते. आयटीआय पोलिस चौकी समोर इंदिरानगरकडे जाणाऱ्या चौकात १२.५ मीटर उंचीच्या हायमास्ट दिव्यासाठी खड्डा खोदण्यात येत आहे. त्याऐवजी रस्ता दुभाजकावर हायमास्ट बसवता आले असते.
असेल तर बदलतो
रस्त्यास आडकाठी होणार नाही अशा प्रकारे तेथे हायमास्ट दिवा बसवण्यात येईल. दोन्ही बाजूंनी वाहने जातील अशा प्रकारे आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होणार नाही.’’ शहाजी पवार, अधिकारी,झोन क्र. सहा