आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका राबवणार जलपुनर्भरणासाठी प्रबोधन मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात भूजल पुनर्भरणासाठी महापालिका जनजागृती करणार आहे. नागरिकांनी आपल्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवावे, ते वाहून जाऊ देऊ नये, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. 
 
महापालिका या कामासाठी साेशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. तसेच ४०० अभियंते आणि आर्किटेक कार्यालयात जनजागृती फलक लावण्यात येत आहे. यासाठी महापालिका नगरसेवकांना एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. 
 
पाणी हे राष्ट्रीय संपत्ती असून, पावसाळ्यात पाणी वाहून जाते. ते जमिनीत गेले पाहिजे, त्यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढेल. त्यांचा फायदा नागरिकांना होईल. त्यासाठी जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे भूजल पातळी उंचावेल आणि अवर्षणाशी मुकाबला करता येईल. याकामी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आधीच पुढाकार घेऊन काम केले. त्यानुसार महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेत जलपुनर्भरण कसे करावे, यांची भित्तिपत्रक लावण्यात आले. 

सोशल मीडिया आणि अभियंता 
जलपुनर्भरणाचे जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून मनपा अभियंत्याच्या वतीने ते सर्वत्र पाठवण्यात येत आहे. महापालिकेचे परवानाधारक असलेले सुमारे ४०० अभियंता असून, त्यांच्या कार्यालयात फलक लावण्यात येणार आहे. तेथे येणारे रोज पाचप्रमाणे दाेन हजार जणांपर्यंत त्यांची माहिती जाईल. 

नगरसेवकांसाठी कार्यशाळा 
महापालिका नगरसेवकांसाठी जलपुनर्भरण प्रकल्प करण्याबाबत प्रभागात जनजागृती करता यावी. यासाठी महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात प्रकल्पाची माहिती देऊन पाणी साठवण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. 

हजार स्क्वेअर फुटाच्या प्लाॅटला सक्तीचे 
महापालिका बांधकाम परवाना विभागाकडून बांधकाम परवाना देताना ज्या प्लाॅटचा आकार पाच हजार स्क्वेअर फूट आहे त्यांना जलपुनर्भरण हे सक्तीचे आहे. जलपुनर्भरण संच बसवल्याशिवाय वापर परवाना देता येत नाही. पाच हजार स्क्वेअर फुटाच्या आतील प्लाॅटधारकांचे मन परिवर्तन करून जलपुनर्भरण संच बसवण्यासाठी मनपा जनजागृती करणार आहे. 

नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन ही योजना राबवावी 
^पाण्याचे महत्त्व ओळखून नागरिकांनी घराच्या छतावरील पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण करावे. त्यामुळे घरातील विंधन विहिरीचे पाण्याची पातळी वाढेल. त्यांचा फायदा नागरिकांना होईल.” संदीप कारंजे, मनपा बांधकाम परवाना विभाग प्रमुख 
 
बातम्या आणखी आहेत...