आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईलाही इफेड्रीनची विक्री, रिपोर्ट मागवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चिंचोळी एमआयडीसी भागातील एव्हाॅन कंपनीचे मुख्य संचालक मनोज जैनला आणून बुधवारी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कागदपत्रांची तपासणी सुरू केली. सोलापूरच्या न्यायालयाने जैन यास शनिवारपर्यंत पोलिस कोठडी दिलेली अाहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार त्यांचे पथक दिवसभर चौकशीत होते. डीएल सुडो इफेड्रीन पदार्थांचा साठा करून चेन्नई महाड (रायगड) येथे बेकायदा विक्री केल्याचा प्रकारही समोर अालेला अाहे. अन्न अौषध प्रशासनाने जैनसह पाच संचालकांवर मोहोळ पोलिसात तीन महिन्यांपूर्वीच गुन्हा दाखल केलेला अाहे.
चेन्नई महाड (रायगड) येथे इफेड्रीन विक्री संदर्भातील एव्हाॅनकडील कागदपत्रे तपासण्यात अाली अाहेत. काहीजणांचे जबाब नोंदवण्यात अाल्याची माहिती श्री. कुंभार यांनी दिली. एव्हाॅन कंपनीने रॅम्बेसीड कंपनीसोबत इफेड्रीन अौषधाचा करार केला होता. कालांतराने कंपनी बंद पडल्यामुळे कंपनीत उत्पादन साठा वाढला. नंतर अार्च फार्मा लॅब नावाने मनोज जैन, राजेंद्र कॅमल अजित कामत यांनी या कंपनीची (२००८-०९ मध्ये) मालकी घेतली. जैनशिवाय अन्य पाच जण अजून गायब अाहेत. त्यांचाही शोध सुरू असल्याचे सांगण्यात अाले. चार किलो सातशे ग्रॅम इफेड्रीन पदार्थ कंपनीत शिल्लक असल्याचा अहवाल कंपनीने अन्न अौषध प्रशासनाकडे दिला अाहे. प्रत्यक्षात पदार्थ कंपनीत नाही.

डीएल इफेड्रीन बेस या पदार्थाला विक्रीचा परवाना नसताना तो विकण्यात अाला. या दोन मुद्यांच्या अाधारे जैनसह पाचजणांवर गुन्हा दाखल अाहे. अन्न अौषध प्रशासनाची चौकशी करण्यात अाली अाहे. तपासात अाणखी काही मुद्दे समोर येतील असे श्री. कुंभार म्हणाले. ग्रामीण ठाणे पोलिसांचा अाजही कंपनीत बंदोबस्त अाहे.

बातम्या आणखी आहेत...