आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात टाळण्यासाठी रुळावर अाता कॅमेऱ्याची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेचा अपघात कधी रुळ बिघाडाने तर कधी चाकातील दोषाने होताे. सोलापूर रेल्वे यांत्रिक विभागाने असे अपघात रोखण्यासाठी नामी शक्कल लढवली. रेल्वे रुळाशेजारी कॅमेरा बसवण्यात आला आहे.
चाकात बिघाड असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती मिळावी यासाठी विकसित यंत्रणा करण्यात आली. सोलापूर विभागातील वाडी रेल्वे स्थानक येथे प्रयोग यशस्वितेनंतर तो सोलापूरसह मुंबईत लोकल सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईत विविध उपनगरीय रेल्वे स्थानकावर याचा वापर करण्यात येणार आहे.

रेल्वे यांत्रिक विभागाने अॅटोमेटिक रोलिंग अॅन्ड रेकॉर्डिंग पद्धत वाडी रेल्वे स्थानक येथे काही दिवसांपूर्वी सुरू केली. या पद्धतीत केवळ रुळाच्या आत कॅमेरा बसवला. एवढेच नाही, तर तेथे इन्फ्रा रेड सेन्सर बसवण्यात आले. यामुळे गाडीच्या स्पंदनाने हे कॅमेरे गाडी येण्यापूर्वी कार्यान्वित होतात. तसेच रेल्वे रुळाशेजारी अंधार असेल तर सेन्सरच्या मदतीने जवळचे विजेचे दिवे आपोआप सुरू होतात. अन् प्रकाश वाढताच आपोआप बंद होतात. रेल्वेच्या चाकातून धूर येत असेल किंवा एखादा भाग तुटला असेल तर याची माहिती लागेच संबंधित कर्मचाऱ्यांना विभागाला देण्यात येते.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या बाजूने कॅमेरा बसवण्यात आला आहे.
रोलिंग इन आणि रेकॉर्डिंग राेलिंगइन म्हणजे गाडी जेव्हा स्थानकावर फलाटावर येते ती स्थिती. गाडी फलाटावर येताना कॅमेराच्या मदतीने तिची पाहणी केली जाईल. चाकात चाकाखाली कोणता दोष आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. दोष असेल तर तत्काळ दूर केला जाईल. त्यामुळे पुढचा रेल्वे अपघात टाळला जाईल. कॅमेरा बसवण्यात आल्याने याचे रेकॉर्डिंग होईल.

६० फ्रेमचा एक कॅमेरा
दोनकॅमेरे रुळाच्या आत तर दोन कॅमेरे रुळाच्या बाजूला बसवले जातील. एक कॅमेरा ६० फ्रेमचा म्हणजे सेकंदात ६० फोटो काढणारा. रुळाशेजारी एक तात्पुरते शेड उभारून तेथे कर्मचारी नेमण्यात येतील.

अपघात रोखण्यासाठी प्रभावी
रेल्वेअपघात रोखण्यासाठी ही विकसित यंत्रणा केली आहे. सध्या वाडी येथे सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ते सोलापूरसह सगळीकडे वापरण्यात येईल. मुंबईत लोकलसाठीही वापरण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी यासाठी मुंबईला बोलवले आहे.” शिवाजीकदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता