आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिव्हिल’मध्ये डोळ्यावरील शस्त्रक्रिया वर्षाकाठी 1000, रुग्णांना पंधरा दिवसांनंतरची देतात वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सिव्हिलमध्ये कान, नाक, घसा विभागाची शस्त्रक्रिया करण्यात येणारे थिएटर सुसज्ज अाहे. सर्व काही ठीक आहे, शस्त्रक्रिया वारंवार झाल्याने विद्यार्थीही व्यवस्थित शिकू शकतात. मात्र वर्षाकाठी आठशे ते हजार शस्त्रक्रिया सिव्हिलमध्ये होत असल्याने एवढ्या कमी कशा काय शस्त्रक्रिया होतात, अशी खंत जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली. 
 
डोळ्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी डाॅ. लहाने सोलापुरात आले होते. त्यावेळी ते सिव्हिलचे आॅपरेशन थिएटर पाहून समाधानी झाले. त्यावेळी विभाग प्रमुख डॉ. एस. सरवदे यांना म्हणाले, शस्त्रक्रिया कमी होत असतील, तर विद्यार्थी कसे शिकणार. रुग्ण जर मिळत नसतील, तर जिल्हा शल्यचिकित्सक यांची मदत घ्या. त्यामुळे ग्रामीण रुग्ण आल्याने शस्त्रक्रिया होतील. जे. जे. रुग्णालयात १३ हजारांहून अधिक डोळ्यांवरील शस्त्रक्रिया होत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. 
 
हेलपाटे मारावे लागतात 
‘सिव्हिल’मध्येवर्षाकाठी डोळ्यावरील शस्त्रक्रिया सुमारे १००० होतात. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना दहा ते पंधरा दिवसांनंतरची वेळ दिली जाते. एखाद्यास मधुमेह अथवा इतर आजार असेल तर त्याच्यावरील गोळ्या देऊन आजार आटोक्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया होऊ शकते. परंतु गर्दी अाहे, असे म्हणत डोळ्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्यांना वारंवार हेलपाटे का मारावे लागतात? या साठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. 
 
नेत्ररोग विभागात पदे रिक्त 
सिव्हिल हॉस्पिटलमधील नेत्र विभागात एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक सहा निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापकांचा पाच जणांची एक टीम तर सहयोगी सहायक प्राध्यापकासह निवासी डॉक्टर अशी पाच जणांची एक टीम आहे. दिवसाला साधारणपणे ते शस्त्रक्रिया केल्या जातात. या विभागात एक सहायक प्राध्यापक एक सिनिअर निवासी डॉक्टराची जागा रिक्त अाहे.
बातम्या आणखी आहेत...